esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २० जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शनिवार : ज्येष्ठ कृ. १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ६.१४, दर्श अमावास्या, भारतीय सौर ३०, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २० जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार : ज्येष्ठ कृ. १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ६.१४, दर्श अमावास्या, भारतीय सौर ३०, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८६९ - किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म.
१८९९ - केंब्रिज विद्यापीठाच्या गणिताच्या अंतिम परीक्षेत पुण्याचे विद्यार्थी रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले येऊन त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला. हा बहुमान पुढे अन्य कोणाही भारतीयाला मिळाला नाही. रॅंग्लर परांजपे पुढे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई इलाख्याचे शिक्षणमंत्री, ऑस्ट्रेलियातील उच्च आयुक्त, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
१९२१ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना. राष्ट्रीय शिक्षणाचा उपक्रम म्हणून सुरू झालेल्या या विद्यापीठाला आता अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे.
१९८७ - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचे निधन.  पक्षीनिरीक्षण आणि वन्य जीवांचे संरक्षण यांवर केलेल्या कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले होते. 
१९९२ - झेकोस्लोव्हाकियाचे संघराज्य विसर्जित करून दोन देशांत त्याचे रूपांतर करण्याचा निर्णय.
१९९६ - अमेरिकेच्या ‘कोलंबिया’ या अवकाशयानाने फ्लोरिडातील तळावरून यशस्वी उड्डाण केले. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी अवकाशमोहीम आहे.
१९९६ - शंभरावे ‘मिग-२३’ हे लढाऊ विमान हवाई दलाच्या ईशान्य विभागात समारंभपूर्वक दाखल.
१९९७ - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्यात सुरू.
१९९७ - चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे (तिसरी कसम) ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन. 
१९९७ - विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मराठी शायरीने वेड लावणारे मराठीतील पहिले शायर वासुदेव वामन ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर यांचे निधन.
१९९७ - ८३ किलो गटात अनिलकुमार मानने अकराव्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताने पहिले सुवर्णपदक संपादले.
१९९९ - बलाढ्य आणि तुल्यबळ म्हणून गणना होणाऱ्या वासिम अक्रमच्या पाकिस्तान संघास साफ निष्प्रभ करून स्टीव वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाने सातव्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विश्‍वविजेतेपद मिळविले. लॉर्डसवरील ही अंतिम लढत या संघाने आठ गडी आणि तब्बल २९.५ षटके राखून जिंकली.
१९९९ - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत एक हजार धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ हा चौथा फलंदाज ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात मार्क वॉने नाबाद ३७ धावा केल्या.
२००४ - भारताच्या अंजू बॉबी जॉर्जने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीतील महत्त्वाच्या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले. अमेरिकेतील प्रि-फाँटीन क्‍लासिक ग्रां. प्रि. स्पर्धेत तिने६.८३ मीटर अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करीत तिसरे स्थान मिळवले.

दिनमान -
मेष : व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. 
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. 
मिथुन : दैनंदिन कामात अडचणी संभवतात. अतिरिक्‍त कामाचा ताण राहील. 
कर्क  : प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील.
सिंह  : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसन्मानाचे योग येतील. 
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. आर्थिक यश लाभेल.
वृश्‍चिक : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. 
धनू : अस्वस्थता राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. चिडचिड होईल.
मकर : महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. 
कुंभ : तुमचा प्रभाव राहील. मानसन्मानाचे योग येतील. कामांचे नियोजन करू शकाल.
मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल.