esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 नोव्हेंबर

पंचांग -
शुक्रवार : कार्तिक शुद्ध ६, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ११.४२, चंद्रास्त रात्री ११.०५, भारतीय सौर कार्तिक २९ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : कार्तिक शुद्ध ६, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ११.४२, चंद्रास्त रात्री ११.०५, भारतीय सौर कार्तिक २९ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
आंतरराष्ट्रीय बालदिन (युनेस्को)

१९२७ -  न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म. सर्च, मणिभवन, सर्वोदय आश्रम (नागपूर), स्त्री आधार केंद्र (पुणे) अशा अनेक संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत. 
१९९७ - अमेरिकेच्या कोलंबिया अवकाशयानातून भारतीय अंतराळवीर कल्पना चावला मोहिमेवर रवाना झाली. पहिली भारतीय महिला अंतराळवीर  बनण्याचा मान त्यांनी पटकाविला.
१९९८ -  प्रख्यात मीमांसक, संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित दत्तात्रेय शास्त्री तांबे गुरुजी यांचे निधन.
१९९९ -  आर.जी.जोशी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.

दिनमान -
मेष :
राजकीय क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल. काहींन प्रवासाचे योग येतील.
वृषभ : गुरूकृपा लाभेल. प्रवासाचे योग येतील. व्यवसायाचे निर्णय पुढे ढकला.
मिथुन : काहींना गुप्त वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 
सिंह : वाहने जपून चालवावीत. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : संततिसौख्य लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील.
तुळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृश्‍चिक : नवा दिशा व नवा मार्ग सापडेल. आरोग्य चांगले राहील. जिद्द वाढेल.
धनु : धनलाभाची शक्‍यता आहे. व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल.
मकर : आरोग्य चांगले राहील. अपेक्षित सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
कुंभ : सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कौटुंबिक जीवनात चिंता लागून राहील.
मीन : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.छोटे प्रवास होतील.

Edited By - Prashant Patil