
पंचांग -
रविवार - अधिक अश्विन शु.४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तुला, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.३२, विनायक चतुर्थी, चंद्रोदय स.९.०७, चंद्रास्त रा.९.०६, भारतीय सौर २९, शके १९४२.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८९७ - ‘सकाळ’चे संस्थापक, संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांचा जन्म. स्वच्छ समाजदृष्टी, संकुचितपणाचा लवलेशही नसलेला उदारमतवाद, कृती-उक्तीतील करडी शिस्त, तसेच त्या शिस्तीतून उगम पावलेली मेहनतीची तयारी या असाधारण वाटलेल्या गुणांमुळे नानासाहेब परुळेकर ही स्वातंत्र्योत्तर मराठी पत्रसृष्टीत सदैव स्मरणात राहावी अशी नाममुद्रा ठरली. वृत्तपत्रक्षेत्रातील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण‘ सन्मानाने गौरविले. त्यांचे ‘निरोप घेता’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
१९२२ - चरित्र वाङ्मयाचे गाढे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक द. न. गोखले यांचा जन्म. त्यांनी एकूण १४ ग्रंथ लिहिले. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट.’ पदवी देऊन गौरविले. त्यांनी ज्ञानकोशकार श्रीधर केतकर, ज्येष्ठ कवी माधव ज्युलियन, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, महात्मा गांधी यांची चरित्रे लिहिली. शिक्षण, साहित्य, शुद्धलेखन आदी विषयांवरही त्यांनी पुस्तके लिहिली.
१९३३ - थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इत्यादी क्षेत्रांत महान कार्य केलेल्या ब्रिटिश महिला ॲनी बेझंट यांचे निधन. त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले. रामायण, महाभारत, उपनिषदे इत्यादींवर व्याख्याने दिली. गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० आहे. त्यांनी १९१६ मध्ये ‘होमरूल लीग’ची स्थापना केली.
१९९६ - ‘बलुतं’ या आत्मचरित्रपर पुस्तकाने मराठी वाङ्मय क्षेत्रात खळबळ उडवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक, कवी दया पवार यांचे निधन.
१९९७ - हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध विनोदी अभिनेते अनुपकुमार यांचे निधन.
२००० - अपंगत्वावर मात करून अपार जिद्दीच्या बळावर जगातील सर्वांत उंचीवरील खारदुंगला खिंड स्कूटरवरून सर करण्याचा विक्रम करणारे राजेंद्र राधाकिशन खंडेलवाल यांचे निधन.
२००१ - माजी राष्ट्रीय हॉकीपटू दामन्ना नरसन्ना निमल यांचे निधन.
२००४ - शैक्षणिक क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एज्युसॅट’ या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘जीएसएलव्ही-एफ-०१’ या वाहकाने या उपग्रहाला उड्डाणानंतर १७ मिनिटांत त्याच्या नियोजित कक्षेत सुखरूप नेले.
दिनमान -
मेष - मनोबल वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.
वृषभ - दुपारी 3 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. नंतर अचानक खर्च वाढू शकतात.
मिथुन - स्वास्थ्य लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
कर्क - काही नवीन परिचय होतील. इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
सिंह - उधारी, उसनवारी वसूल होईल. गाठीभेटी होतील. तुमची मते इतरांना पटवून द्याल.
कन्या - आजचा दिवस चांगला आहे. उत्साह वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
तूळ - महत्त्वाची कामे दुपारी 3 नंतर करावीत. उत्साहाने कामे कराल. कार्यात सुयश लाभेल.
वृश्चिक - महत्त्वाचे आर्थिक व्यवहार जपून कराल. प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्यता.
धनू - कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील.
मकर - सुयश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. मानसिक प्रसन्नता लाभेश.
कुंभ - अचानक धनलाभाची शक्यता आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
मीन - प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात धाडस करू शकता. महत्त्वाचे निर्णय टाळावेत.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.