esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २१ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - श्रावण शु. १ चंद्रनक्षत्र पुष्य चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय स. ६.२५ चंद्रास्त रा.८.०४ , भारतीय सौर ३०, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २१ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - श्रावण शु. १ चंद्रनक्षत्र पुष्य चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय स. ६.२५ चंद्रास्त रा.८.०४ , भारतीय सौर ३०, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८१६ - जगातील सर्वांत मोठ्या आणि ख्यातनाम वृत्तसंस्थेचे जनक पॉल ज्युलिअस रॉयटर यांचा जन्म. ‘रॉयटर’ या त्यांच्या नावानेच ही वृत्तसंस्था जगभर ओळखली जाते. शंभराहून अधिक देशातील वृत्तपत्रे रॉयटरची वृत्तसेवा घेतात.
१९१० - महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती आणि रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म. स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, शेतीच्या अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून त्यांनी कीर्ती मिळविली.
१९९४ - प्रसिद्ध इतिहास संशोधक, वाङ्‌मय समीक्षक व मराठी बखर वाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन.
१९९५ - ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक व मेंडोलिनवादक सज्जाद हुसेन यांचे निधन.
२००५ - कसोटीपटू चंदू बोर्डे यांचे ७२ व्या वर्षांत पदार्पण. कसोटीपटू, कर्णधार, संघव्यवस्थापक, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अशा भूमिकांतून भारतीय क्रिकेटची सेवा केलेले चंदू बोर्डे यांना अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले आहे.

दिनमान -
मेष :
शासकीय कामात यश. उत्साह व उमेद वाढेल. तुमचा प्रभाव पडेल.
वृषभ : आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. चांगल्या घटना घडतील
मिथुन : आर्थिक लाभ होतील. शासकीय कामात यश मिळेल. अडचणीवर मात कराल.
कर्क : व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. एखादी चिंता अस्वस्थ करेल.
कन्या : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. अनेक कामे मार्गी लागतील.
तुळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. एखादी चांगली संधी लाभेल.
वृश्‍चिक : व्यवसायात वेगाने प्रगती होईल. काहींना गुरूकृपा लाभेल.
धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे.
मकर : जबाबदारी वाढेल. एखाद्या कामाची चिंता राहील.
कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
मीन : शैक्षणिक कामात यश लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Edited By - Prashant Patil