esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : आषाढ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय दुपारी ४.४१, चंद्रास्त पहाटे ३.५८, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१२, प्रदोष, वामन पूजन, शाक-गोपद्म व्रतारंभ, बकरी ईद, भारतीय सौर आषाढ ३० शके १९४३.

दिनविशेष -

१९३० : संतसाहित्य व लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक व संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा जन्म. त्यांचे ‘खंडोबा’, ‘लज्जागौरी’, ‘श्री विठ्ठल ः एक महासमन्वय’ इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

१९९४ : प्रसिद्ध इतिहास संशोधक, वाङ्‌मय समीक्षक व मराठी बखर वाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन.

१९९५ : ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक व मेंडोलिनवादक सज्जाद हुसेन यांचे निधन.

१९९७ : प्रसिद्ध साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन. श्री. राजवाडे हे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते.

१९९८ : ज्येष्ठ इतिहास संशोधक, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब बापूसाहेब ऊर्फ बा. बा. महाराज यांचे निधन.

दिनमान -

मेष : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने सावकाश चालवावीत.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तूळ : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक सुयश लाभेल.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

धनू : वाहने जपून चालवावीत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कुंभ : नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

मीन : तुमच्यावर जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

loading image