esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : आषाढ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सायंकाळी ५.४६,

चंद्रास्त पहाटे ५.०१, महाराष्ट्रीय बेंदूर,

भारतीय सौर आषाढ ३१ शके १९४३.

दिनविशेष -

१९२३ : प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचा जन्म. ‘आ लौट के आजा मेरे मीत’, ‘दिल ढूँढता है’, ‘ये मेरा दिवानापन है’, ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, ‘इक दिन बिक जायेगा माटी के मोल’, ‘चंदन सा बदन चंचल चितवन’ इ.त्यांची गाणी लोकप्रिय आहेत.

१९८४ : नामवंत साहित्यिक गजानन लक्ष्मण ऊर्फ ग. ल. ठोकळ यांचे निधन. कथा, कविता, कादंबरी अशा सर्व माध्यमांतून त्यांनी रसरशीत आणि जिवंतपणे ग्रामीण जीवनाचे, स्पंदनाचे चित्रण केले

दिनमान -

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.

वृषभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.

मिथुन : जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

सिंह : संततिसौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. हितशत्रूंवर मात कराल.

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

धनू : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मकर : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी जबाबदारी येऊन पडेल.

कुंभ : आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : वरिष्ठांबरोबर मतभेद. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

loading image