
पंचांग -
रविवार : श्रावण शुद्ध १५, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सायंकाळी ७.०९, चंद्रास्त सकाळी ६.५३, सूर्योदय ६.१९, सूर्यास्त ६.५५, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पौर्णिमा समाप्ती सायंकाळी ५.३२, भारतीय सौर श्रावण ३१ शके १९४३.
दिनविशेष -
१९८२ : कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारक उभारणारे एकनाथजी रानडे यांचे निधन. मोठमोठ्या देणग्या न जमविता जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असावा म्हणून एक एक रुपया जमवून त्यांनी हे प्रचंड काम उभे केले होते.
१९९९ : मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांडरे यांचे निधन. बेबंदशाही, आग्र्याहून सुटका, तुझे आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, झुंझारराव ही त्यांची काही गाजलेली नाटके. बहिर्जी नाईक, पवनाकाठचा धोंडी, मोहित्यांची मंजुळा, वारणेचा वाघ, थोरातांची कमळा, मीठभाकर, साधी माणसं, नेताजी पालकर इ. त्यांच्या गाजलेल्या काही चित्रपटांची नावे. त्यांच्या ‘धाकटी पाती’ या आत्मचरित्राला राज्य पुरस्कार मिळाला.
१९९९ : भारताने देशातच विकसित केलेल्या ‘पिनाका’ या रॉकेट प्रक्षेपकाची कारगिल टापूतील चाचणी यशस्वी.
२००३ : अंजली भागवत (नेमबाजी) व के. एम. बिनामोल (ॲथलेटिक्स) यांना संयुक्त राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर.
दिनमान -
मेष : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
वृषभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : शासकीय कामे पुढे ढकलावीत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
तूळ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. इतरांवर प्रभाव राहील.
वृश्चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
धनू : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.