आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 December 2020

पंचांग -
मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ७.०४ सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी १२.५७, चंद्रास्त रात्री १.१३, दुर्गाष्टमी, अयन करिदिन, भारतीय सौर पौष १ शके १९४२.

पंचांग -
मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ७.०४ सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी १२.५७, चंद्रास्त रात्री १.१३, दुर्गाष्टमी, अयन करिदिन, भारतीय सौर पौष १ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९७ - सुवर्णकन्या पी. टी. उषाने आंतरराज्य मैदानी स्पर्धेत दोनशे मीटरची शर्यत २३.२९ सेकंदांचा विक्रम नोंदवीत जिंकली.
१९९९ - महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या माजी कर्णधार व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अरुणा चव्हाण-साटम यांचे निधन.
२००१ - साहित्य अकादमीचा मराठीतील उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार राजन गवस यांच्या ‘तणकट’ या कादंबरीला जाहीर.
२००१ - संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमेरिकेत तरुण संशोधकांना दिला जाणारा ‘अध्यक्ष पुरस्कार’ कोल्हापूर येथील शेखर शरद गर्दे यांना जाहीर. श्री. गर्दे गेली आठ वर्षे अमेरिकेत प्रथिनावर सूक्ष्म संशोधन (प्रोटिन्स-स्ट्रक्‍टर फंक्‍शन व जेनेटिक्‍स) करत आहेत. 
२००३ - ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, पं. बालसुब्रह्मण्यम्‌, एम. एस. सुब्बलक्ष्मी, सरोदवादक शरण राणी आणि शहनाईनवाज उस्ताद बिस्मिल्लाखाँ यांना ‘भारतीय राष्ट्रीय कलाकार’ सन्मान जाहीर.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे.
वृषभ : आर्थिक लाभाचे योग संभवतात. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : मनोबल कमी राहील. वादविवादात सहभाग टाळावा. अनपेक्षित एखादा खर्च वाढेल.
कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील.
तुळ : गडी, नोकरचाकर, हाताखालील कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्च वाढेल.
वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो.
मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 22nd December 2020