esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २२ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २२ जुलै

पंचांग -
बुधवार - श्रावण शु. 2, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.10, सूर्यास्त 7.14, चंद्रोदय स.7.27, चंद्रास्त रा.8.54, भारतीय सौर 31, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २२ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - श्रावण शु. 2, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.10, सूर्यास्त 7.14, चंद्रोदय स.7.27, चंद्रास्त रा.8.54, भारतीय सौर 31, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२३ - प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचा जन्म. ‘आ लौट के आजा मेरे मीत’, ‘दिल ढूँढता है’, ‘ये मेरा दिवानापन है’, ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, ‘इक दिन बिक जायेगा माटी के मोल’, ‘चंदन सा बदन चंचल चितवन’ इ.त्यांची गाणी लोकप्रिय आहेत.
१९३० - ख्यातनाम गणितज्ञ डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा जन्म. त्यांनी अलजिब्राईक जॉमेट्री, कॉम्प्युटेटिव्ह अलजिब्रा, फंक्‍शन थियरी, क्वांटम इलेक्‍ट्रोडायनॅमिक्‍स, लोकल अलजिब्रा, गॅलवा-ग्रुप थिअरी इत्यादी विषयांत मूलभूत संशोधन केले.आजपावेतो त्यांचे १४० च्या वर संशोधनपर लेख व ११ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. संशोधनाबद्दल अनेक पारितोषिके आणि सन्मान त्यांना मिळाले आहेत.
१९८४ - नामवंत साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण ऊर्फ ग. ल. ठोकळ यांचे निधन. कथा, कविता, कादंबरी अशा सर्व माध्यमांतून त्यांनी अतिशय रसरशीत आणि जिवंतपणे ग्रामीण जीवनाचे, स्पंदनाचे  चित्रण केले.
१९८४ - दलित चळवळीतील स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे आघाडीचे नेते, डॉ. आंबेडकरांचे सहकारी, माजी खासदार पांडुरंग नाथुजी ऊर्फ बापूसाहेब राजभोज यांचे निधन.

दिनमान -
मेष :
वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल.
मिथुन : शासकीय कामात यश लाभेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
कर्क : सर्व क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे ताणतणाव वाढतील.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तुळ : तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. शासकीय कामात यश. विद्यार्थ्यांन यश मिळेल.
वृश्‍चिक : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
धनु : कामात अडचणी येतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका.
मकर : उत्साह, उमेद वाढेल. कामाचा ताणतणाव वाढणार आहे.
कुंभ : काहींना हितशत्रुंचा त्रास होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.
मीन : व्यवसायात प्रगती होईल. शासकीय कामात यश मिळेल. उत्साह व उमेद वाढेल.

Edited By - Prashant Patil