आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २२ जून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

पंचांग -
सोमवार - आषाढ शु. १, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१४, आषाढ मासारंभ, चंद्रोदय प. ६.४०, चंद्रास्त रा. ८.२६, भारतीय सौर १, शके १९४२

पंचांग -
सोमवार - आषाढ शु. १, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१४, आषाढ मासारंभ, चंद्रोदय प. ६.४०, चंद्रास्त रा. ८.२६, भारतीय सौर १, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९६ - नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांचा जन्म. त्यांनी पौराणिक, ऐतिहासिक, संतपट, सामाजिक, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा सुमारे पाऊणशे चित्रपटांतून विविध भूमिका केल्या.
१८९७ - पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलूमाचा  प्रतिशोध म्हणून प्लेग नियंत्रणासाठी नेमलेल्या चार्ल्स रॅंड या मुलकी अधिकाऱ्याला दामोदर हरी चापेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.
१९३२ - चतुरस्र अभिनेता, लोकप्रिय खलनायक अमरिश पुरी यांचा जन्म. 
१९५५ - प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू व गुगली गोलंदाज सदू शिंदे यांचे निधन.
१९९३ - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शेतीतज्ज्ञ दिनकर बापू पाटील यांचे निधन.
१९९४ - महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर. सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांत महिलांसाठी तीस टक्के राखीव जागा.
१९९५ - मुंबई विद्यापीठातील माजी कुस्तीगीर सदाशिवराव देशमुख यांची ब्रिटनमधील कॅमडेनचे महापौर म्हणून निवड.
१९९८ - हिंदुस्थान एरॉनॉटिक्‍स लिमिटेडने विकसित केलेल्या व जुळणी केलेल्या अत्याधुनिक हलक्‍या हेलिकॉप्टरच्या सर्व चाचण्या यशस्वी.
२००१ - नामवंत अर्थतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी उपसंचालक डॉ. अरुण घोष यांचे निधन.
२००३ - वयाच्या ७३ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल, अशा उत्साहात संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ‘एसयू ३० एमके आय’ या लढाऊ विमानातून सहवैमानिक म्हणून उड्डाण केले.

दिनमान -
मेष : काहींना सुसंधी लाभेल. नोकरीमध्ये रेंगाळलेली कामे हळूहळू मार्गी लावू शकाल. 
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य चांगले राहणार. मानसिक समाधान लाभेल.
मिथुन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. निर्णय वरिष्ठांबरोबर चर्चा करून घ्यावेत. 
कर्क  : प्रवास टाळावेत. आपली रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. 
कन्या : व्यवसायातील उलाढाल वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. 
तूळ : काहींना गुरुकृपा लाभेल. व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील.
वृश्‍चिक : वादविवादांपासून दूर राहावे. मुलामुलींचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करावा. 
धनू : व्यवसायामध्ये भागीदाराबरोबर सुसंवाद साधू शकाल. कामे मार्गी लागतील.
मकर : नोकरीतील व्यक्‍तींनी कोणतेही काम वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय करू नये. 
कुंभ : आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रवासात काळजी घ्यावी. 
मीन : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. लहानसहान कामे मार्गी लावू शकाल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 22nd June 2020