esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 जून 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 जून 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय दुपारी ४.४५, चंद्रास्त पहाटे ४.१७, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, भौमप्रदोष, अयन करिदिन, वटसावित्री व्रतारंभ, जलकुंभ दान करणे, भारतीय सौर आषाढ १ शके १९४३.

दिनविशेष -

१९३२ : चतुरस्र अभिनेता, लोकप्रिय खलनायक अमरिश पुरी यांचा जन्म.

१९५५ : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू व गुगली गोलंदाज सदू शिंदे यांचे निधन.

१९९३ : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शेतीतज्ज्ञ दिनकर बापू पाटील यांचे निधन.

१९९४ : महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर. सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांत महिलांसाठी तीस टक्के राखीव जागा.

१९९४ : ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद यांचे निधन. ‘एक दुजे के लिये’, ‘खिलौना’, ‘छोटी बहन’, ‘शारदा’ इत्यादी त्यांचे चित्रपट गाजले होते.

१९९५ : मुंबई विद्यापीठातील माजी कुस्तीगीर सदाशिवराव देशमुख यांची ब्रिटनमधील कॅमडेनचे महापौर म्हणून निवड.

दिनमान -

मेष : कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमच्यावर एखादी जबाबदारी पडेल.

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विरोधकांवर मात कराल.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मागीं लागतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.

कन्या : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.

तूळ : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

धनू : आध्यात्माकडे कल राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींची वैचारिक प्रगती होईल.

कुंभ : गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव येतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

loading image