esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 23 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध ९, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ७.०४ सूर्यास्त ६.०३, चंद्रोदय दुपारी १.३१, चंद्रास्त रात्री २.०१, कल्पादी, भारतीय सौर पौष २ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 23 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध ९, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ७.०४ सूर्यास्त ६.०३, चंद्रोदय दुपारी १.३१, चंद्रास्त रात्री २.०१, कल्पादी, भारतीय सौर पौष २ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
किसान दिन

१९४० : वालचंद हिराचंद यांनी बंगळूर येथे ‘हिंदुस्थान एअरक्राफ्ट’ या कारखान्याची स्थापना करून भारतातील विमान निर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. राष्ट्रीयीकरणानंतर या कारखान्याला ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स’ असे नाव दिले गेले.
१९९८ : लोकनायक जयप्रकाश नारायण यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९९८ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सहकार चळवळीतील अग्रणी, इचलकरंजी येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार रत्नाप्पा कुंभार यांचे निधन.स्वातंत्र्यलढ्यात सलग सहा वर्षे भूमिगत राहून त्यांनी ऐतिहासिक स्वरूपाचेच काम केले.  पद्मश्री, डी.लिट. अशा सन्मानांनी त्यांना गौरविले.
२००४ : भारताचे माजी पंतप्रधान, भारतीय अर्थव्यवस्थेच्या जागतिकरणाचे जनक, बहुभाषाकोविद, साहित्यिक, विद्वान आणि धुरंधर राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांचे निधन. 

दिनमान -
मेष :
प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील.
वृषभ : प्रवास सुखकर होतील. अपेक्षित गाठीभेटी होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. अचानक धनलाभ संभवतो.
कर्क : जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह : वाहने सावकाश चालवावीत. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
तुळ : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
धनु : मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीतील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.
कुंभ : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. गुप्त वार्ता समजेल.
मीन : तुमचे मनोबल वाढविणारी घटना घडेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

Edited By - Prashant Patil