esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २३ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - श्रावण शु. 3, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय स.8.29, चंद्रास्त रा.9.40, भारतीय सौर 1, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २३ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - श्रावण शु. 3, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय स.8.29, चंद्रास्त रा.9.40, भारतीय सौर 1, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
वनसंवर्धन दिन

१८५६ - थोर नेते, भगवद्‌गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी येथे जन्म.  त्यांचे प्रमुख ग्रंथ ‘गीतारहस्य’, ‘ओरायन’, ‘आर्क्‍टिक होम इन द वेदाज’, ‘वेदांगज्योतिष’ हे होत.
१८९८ - बंगाली साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार  विजेते ताराशंकर बंदोपाध्याय यांचा जन्म. १९६७ मध्ये त्यांच्या ‘गणदेवता’ या कादंबरीची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली. भारत सरकारने ‘पद्मविभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला होता.
१९०६ - स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म.
१९१७ - नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत ऊर्फ माई भिडे यांचा जन्म. छोटा गंधर्व यांच्याबरोबर ‘मानापमान’, ‘सौभद्र’ इ.नाटकातून व ‘जगाच्या पाठीवर’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ इ. मराठी सिनेमातून त्या चमकल्या.
१९८३ - संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या कल्पक्कम अणुवीज केंद्राचे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्‌घाटन.
१९९३ - ‘इन्सॅट-२ ब’ या भारताच्या बहुउद्देशीय उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन अग्निबाणाद्वारे यशस्वी उड्डाण.
१९९७ - ज्येष्ठ गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.

दिनमान -
मेष :
मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. संततिसौख्य लाभेल.खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : व्यवसायाची उलाढाल वाढेल. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.
मिथुन : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. कामात अडचणी जाणवतील.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.
सिंह : प्रतिष्ठा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील.खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.
तुळ : मित्रांचे सहकार्य लाभेल. अनेक कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांन यश मिळेल.
वृश्‍चिक : व्यवसायाची उलाढाल वाढेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
धनु : अडचणी संपणार आहेत. थोरामोठ्यांचे परिचय होतील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
मकर : वैवाहिक जीवनात मतभेद होतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कुंभ : थोरामोठ्यांची कृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil