
पंचांग -
मंगळवार - आषाढ शु. २, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. ७.३७, चंद्रास्त रा. ९.२०, भारतीय सौर २, शके १९४२.
पंचांग -
मंगळवार - आषाढ शु. २, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. ७.३७, चंद्रास्त रा. ९.२०, भारतीय सौर २, शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१९५३ - हिंदू महासभेचे नेते, भारतीय जनसंघाचे पहिले अध्यक्ष आणि पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील व्यापारमंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे निधन.
१९८० - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे चिरंजीव आणि काँग्रेसचे खासदार संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन.
१९८१ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचे निधन. केंद्रीय अन्नमंत्री, रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी प्रभावी काम केले.
१९८२ - बालगंधर्व आणि मा. कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे व गंधर्व नाटक मंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.
१९९४ - बालगंधर्वांचे चरित्रकार, नाटककार, साहित्यिक आणि साक्षेपी समीक्षक वसंत शांताराम देसाई यांचे निधन. ‘बालगंधर्व ः व्यक्ती आणि कला’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे बालगंधर्वांचे साक्षात भावपूर्ण, रसपूर्ण चित्र होय.
१९९४ - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून ‘ऑलिंपिक चळवळ’ शताब्दी महोत्सव पॅरिस येथे साजरा.
१९९६ - बांगलादेशातील दुसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना वाजेद यांचा शपथविधी.
१९९८ - दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली अमेरिकेची ‘यूएसएस मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
२००० - नामवंत तबलावादक उस्ताद निजामुद्दीन खाँ यांचे निधन.
२००३ - व्यापारवृद्धीच्या सामंजस्य कराराबरोबरच दोन देशांमधील संबंधांची आणि सहकार्याची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणारा ऐतिहासिक जाहीरनामा भारत आणि चीन देशांदरम्यान करण्यात आला. तब्बल बारा वर्षांनंतर दोन देशांत करार झाला.
दिनमान -
मेष : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. बाहेर पडताना काळजी घ्यावी.
वृषभ : मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.
मिथुन : मुला-मुलींबरोबर वादविवाद टाळावा. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
कर्क : गेल्या काही दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला जाईल. वादविवाद मिटतील.
सिंह : ध्यानधारणा यामध्ये मन रमेल. कुटुंबातील व्यक्तींबरोबर वेळ घालवू शकाल.
कन्या : आरोग्य चांगले राहील. अतिमहत्त्वाचे काम असेल, तरच घराबाहेर पडावे.
तुळ : व्यवसायामध्ये उलाढाल होईल. घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.
वृश्चिक : आजचा दिवस चांगला जाईल. खर्चाचे प्रमाण कमी होईल. वादविवाद टळेल.
धनु : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. महत्त्वाच्या कामांशिवाय बाहेर पडू नये.
मकर : जोडीदाराबरोबर सुसंवाद साधू शकाल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे.
कुंभ : मित्र-मैत्रिणींच्या आश्वासनांवर अवलंबून राहू नये. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.