esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 23 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 23 ऑक्टोबर

पंचांग -
शुक्रवार - निज आश्विन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.०५, चंद्रोदय दुपारी १, चंद्रास्त रात्री १२.१८, सरस्वती बलिदान, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), सूर्याचा स्वाती नक्षत्रप्रवेश, वाहन – म्हैस, आयंबोल ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर कार्तिक १ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 23 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - निज आश्विन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.०५, चंद्रोदय दुपारी १, चंद्रास्त रात्री १२.१८, सरस्वती बलिदान, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), सूर्याचा स्वाती नक्षत्रप्रवेश, वाहन – म्हैस, आयंबोल ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर कार्तिक १ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२४ : व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण.  ‘टनेल ऑफ टाइम’ या नावाने त्यांनी इंग्रजीतून आपले आत्मचरित्र लिहिले  आहे.
१९९९ : आंतरराष्ट्रीय धावपटू, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नंदा जाधव यांचे निधन.
१९९९ : ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘कबीर’ पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात नवनवीन संधी लाभेल.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्यता आहे. 
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : हाताखालील कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : संततीचे प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे पत्र व्यवहार पुढे ढकलावेत.
तुळ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.
वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना गुरूकृपा लाभेल.
धनु : आर्थिक व्यवहार जपून करावेत. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुमचे मते इतरांना पटवून द्याल.
कुंभ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.
मीन : संततीसंदर्भात प्रश्‍न उद्भवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.

Edited By - Prashant Patil