esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 23 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - अधिक अश्‍विन शु.7, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.30, चंद्रोदय दु. 12.14, चंद्रास्त रा. 11.38, भारतीय सौर 1, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 23 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - अधिक अश्‍विन शु.7, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.30, चंद्रोदय दु. 12.14, चंद्रास्त रा. 11.38, भारतीय सौर 1, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७३ : महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१८८४ : महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘बाँबे मिल हॅंड्‌स असोसिएशन’ नावाने गिरणी कामगारांची संघटना स्थापना केली. भारतातील संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय.
१९०८ : हिंदीतील कवी व लेखक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रामधारी सिंह ‘दिनकर’ यांचा जन्म. भागलपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळली. केंद्रीय गृहमंत्रालयाचे ते हिंदी भाषाविषयक सल्लागार होते.
१९११ : भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्‍वर कृष्णन यांचा जन्म. त्यांचे प्रमुख संशोधन प्रकाशाचे विखुरणे, वर्णपट विज्ञान, स्फटिकभौतिकी व अणुकेंद्रीय भौतिकी या शाखांतील आहे. त्यांनी एका नवीन प्रकाशकीय परिणामाचा शोध लावला व सैद्धांतिकरीत्या त्याचे व्यापक स्वरूप प्रस्थापित केले. या परिणामाला ‘कृष्णन परिणाम’ असे नाव प्राप्त झाले आहे.
१९१९ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. त्यांची ‘अ पायलट सर्व्हे ऑफ शिरुर तालुका - ॲग्रो इंडस्ट्रिअल बॅलन्स’, ‘क्‍लाइंबिंग अ वॉल ऑफ ग्लास’, ‘सरदार सरोवर डिबेट’, ‘ओ नर्मदा’ इ. अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

दिनमान -
मेष :
प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. आरोग्य चांगले राहील. धनलाभाची शक्यता आहे.
वृषभ : उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. कामाचा ताण जाणवेल. प्रतिकूलता जाणवेल.
सिंह : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
कन्या : शासकीय कामे पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
तुळ : आर्थिक सुयश लाभेल. खर्च योग्य कामासाठी होतील. कौटुंबिक वादविवाद टाळा.
वृश्‍चिक : शत्रुपिडा नाही. विनाकारण वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.
धनु : प्रवासात दक्षता घ्यावी. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.  कोणालाही जामीन राहू नये.
मकर : मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रगती होईल. कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कुंभ : प्रतिष्ठा लाभेल. अनेक कामे धाडसाने पार पाडाल. राजकीय क्षेत्रात प्रगती.
मीन : कलाकारांना संधी लाभेल. सर्वत्र यश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

Edited By - Prashant Patil