
पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ७.०४ सूर्यास्त ६.०३, चंद्रोदय दुपारी २.०४, चंद्रास्त रात्री २.४८, भारतीय सौर पौष ३ शके १९४२.
पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ७.०४ सूर्यास्त ६.०३, चंद्रोदय दुपारी २.०४, चंद्रास्त रात्री २.४८, भारतीय सौर पौष ३ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८९९ - नामवंत मराठी लेखक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा जन्म. त्यांनी पन्नासांहून अधिक पुस्तके लिहिली असून त्यातील अनेक पुस्तकांच्या लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. त्यांचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
२००१ - ज्येष्ठ चित्रकार व कलाध्यापक अरुण श्रीपाद फडणीस यांचे निधन.
२००३ - मराठीतील ज्येष्ठ समीक्षक, कादंबरीकार त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्यासह कमलेश्वर, प्रफुल्ल रॉय, सारा जोसेफ, ज्येष्ठ तमीळ कवी वैरमुथू आणि समीक्षक के. व्ही सुब्बण्णा यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या ‘डांगोरा एकानगरीचा’ या पुस्तकाला हा पुरस्कार घोषित झाला.
दिनमान -
मेष : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
वृषभ : मनोबल कमी राहील. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन : वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
कर्क : सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
तुळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्चिक : मनोबल कमी राहील. अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य उत्तम राहील.
मकर : व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल.
कुंभ : आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.
मीन : प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
Edited By - Prashant Patil