आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २४ जानेवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

पंचांग -
रविवार : पौष शुद्ध ११, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.१० सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय दुपारी २.३३, चंद्रास्त पहाटे ४.०४, पुत्रदा एकादशी, मन्वादी, भारतीय सौर माघ ३ शके १९४२.

पंचांग -
रविवार : पौष शुद्ध ११, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.१० सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय दुपारी २.३३, चंद्रास्त पहाटे ४.०४, पुत्रदा एकादशी, मन्वादी, भारतीय सौर माघ ३ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९५० : भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांची निवड. याच दिवशी ‘जन गण मन’ हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.
१९६६ : एअर इंडियाचे ‘कांचनगंगा’ विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळले. या अपघातात भारतातील अणू विज्ञानाचे शिल्पकार डॉ.होमी भाभा यांचे निधन झाले.
१९९९ : कॅन्सर या असाध्य रोगांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या डॉ.सुमती भिडे यांचे निधन.
२००४ : ज्येष्ठ पार्श्‍वगायक महेंद्र कपूर यांना संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल कवी प्रदीप पुरस्कार जाहीर. 
२००४ : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रॉबिन सिंग याने आंतरराष्ट्रीय तसेच प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताकडून १३६ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या रॉबिन सिंगने २५.९५ च्या सरासरीने २३३६ धावा फटकावलेल्या आहेत. 

दिनमान -
मेष :
उधारी व उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : काहींचा वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात प्रगती होईल.
कन्या : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. प्रवास सुखकर होतील.
तुळ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
वृश्‍चिक : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. व्यवसायात वाढ करू शकाल.
धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल.आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 24th January 2021