esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २4 जून

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - आषाढ शु. ३, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. ८.३७, चंद्रास्त रा. १०.११, भारतीय सौर ३, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २4 जून
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - आषाढ शु. ३, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. ८.३७, चंद्रास्त रा. १०.११, भारतीय सौर ३, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९७ - प्रसिद्ध गायक, संगीत क्षेत्रातील एक अभ्यासक, कलावंत, पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. त्यांना १९५५ मध्ये ‘पद्मश्री’ सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.
१८९९ - मर्दानी रूप, तिन्ही सप्तकांतून सहजतेने फिरणारा; पण माधुर्य न गमावणारा आवाज या देणग्या उपजतच असलेले नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक यांचा जन्म.
१८९९ - क्रांतिवादी बंगाली मुस्लिम कवी आणि हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रभावी समर्थक कवी काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म. त्यांनी दोन हजारांहून अधिक भावगीते नवनवीन छंदांत रचली. भारताच्या फाळणीचे ते विरोधक होते.
१९८० - माजी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांचे निधन. त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९९६ - अलिगड मुस्लिम विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक डॉ. मोहंमद शरीफ यांना अलाहाबाद विद्यापीठातर्फे संस्कृतमधील डी.लिट पदवी प्रदान. अशा प्रकारचा सन्मान मिळालेले डॉ. शरीफ हे पहिलेच मुस्लिम आहेत.
१९९६ - ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन’मध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे नामवंत पत्रकार अप्पन मेनन यांचे निधन.
१९९७ - आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचे निधन.
१९९८ - ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण पुरस्कार’ जाहीर.
२००१ - ‘आयएनएस विराट’ ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल.

दिनमान -
मेष : प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे जाणीवपूर्वक करावीत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. 
वृषभ : कामानिमित्त लहानसहान प्रवास घडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
मिथुन : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कर्क  : नातेवाइकांबरोबर वादविवादाची शक्‍यता आहे. कुटुंबासाठी खर्च कराल.
सिंह : नको त्या कारणांसाठी वेळ व पैसे खर्च होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
कन्या : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार. 
तूळ : काहींना अपेक्षित क्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. 
वृश्‍चिक : कोणाच्याही आश्‍वासनावर पूर्णपणे अवलंबून राहू नये.  
धनू : काहींना अचानक धनलाभ संभवतो. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता. 
मकर : विरोधकावर मात कराल. हितशत्रुंच्या कारवायांवर मात कराल. 
कुंभ : कोणालाही उधारीवर पैसे देऊ नयेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 
मीन : मित्रमैत्रिणींशी संपर्क साधू शकाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.