esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 नोव्हेंबर

पंचांग -
मंगळवार - कार्तिक शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.४७ सूर्यास्त ५.५४, चंद्रोदय दुपारी २.२४, चंद्रास्त रात्री २.३१, भारतीय सौर मार्गशीर्ष ३ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - कार्तिक शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.४७ सूर्यास्त ५.५४, चंद्रोदय दुपारी २.२४, चंद्रास्त रात्री २.३१, भारतीय सौर मार्गशीर्ष ३ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७९ - भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत मोरेश्‍वर छत्रे यांनी मुंबई येथे ग्रॅंड इंडियन सर्कसचा पहिला शो क्रॉस मैदानावर केला आणि भारतीय सर्कसचा जन्म झाला.
१९९६ - ‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’चा ‘आशुतोष मुखर्जी स्मृती पुरस्कार’ ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा यांना जाहीर.
२००० - भारत आणि चीनदरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किलोमीटर भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी जाहीर केले.
२००१ - महाराष्ट्राच्या माधुरी गुरनुलेने ३१ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
२००२ - जम्मू येथील प्रख्यात रघुनाथ मंदिरावर दहशतवाद्यांचा हल्ला. तीन तासांच्या धुमश्‍चक्रीनंतर मंदिर मुक्त.
२००२ - महाराष्ट्राचे माजी रणजीपटू यशवंत प्रभाकर ऊर्फ बाबा सिधये यांचे निधन. अष्टपैलू खेळाडू असलेले बाबा सिधये यांनी १९५२-५३ ते १९६०-६१ या दहा वर्षांच्या कालावधीत ४२ रणजी सामना खेळले.

दिनमान -
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : नवीन परिचय होतील. व्यवसायात आर्थिक लाभ होतील.
मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. सार्वजनिक कामात उत्साह वाढेल.
कर्क : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता. 
सिंह : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील.
कन्या : वैवाहिक जीवनात अडचणी संभवतात. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
वृश्‍चिक : मनोबल उत्तम राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनु : गुंतवणुकीची कामे दुपारनंतर पार पडतील.  प्रवास सुखकर होतील. 
मकर : आपली मते इतरांना पटवून द्याल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
कुंभ : अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत.

Edited By - Prashant Patil

loading image