esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 25 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - भाद्रपद शु. 7, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.20, सूर्यास्त 6.55, चंद्रोदय दु.12.20, चंद्रास्त रा.11.57, भारतीय सौर 3, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 25 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - भाद्रपद शु. 7, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.20, सूर्यास्त 6.55, चंद्रोदय दु.12.20, चंद्रास्त रा.11.57, भारतीय सौर 3, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८२ -  सूर्यमालेतील युरेनस ग्रहाचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलविद विल्यम हर्षेल यांचे निधन.
१९१९ - लंडन आणि पॅरिसदरम्यान प्रवासी विमानसेवा सुरू. ही जगातील पहिली विमानसेवा.
१९२५ - मध्यवर्ती कायदेमंडळाचे अध्यक्ष म्हणून मोतीलाल नेहरू यांची निवड. या पदावर निवडले जाणारे ते पहिलेच भारतीय होत.
१९३० - जेम्स बाँडच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते सीन कॉनरी यांचा जन्म.
१९३८ - योगविद्येतील ज्येष्ठ ज्ञानी विष्णू भास्कर लेले यांचे निधन. योगी अरविंद यांचे ते गुरू होत.
१९९८ - ‘एन्सायक्‍लोपीडिया ब्रिटानिका’ या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीची आयात करण्यावर सरकारने बंदी घातली. या आवृत्तीतील नकाशांमध्ये देशाची सरहद्द चुकीची दाखविल्यामुळे, तसेच जम्मू-काश्‍मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय .
२००० - सहकार क्षेत्रातील नेते दिनकर अण्णा तथा नानासाहेब कोरे यांचे निधन.
२००४ - पुणे येथील गंज पेठेतील देवळाची तालमीचे वस्ताद आणि जुन्या काळातील नामवंत पैलवान विठोबा पांडुरंग मानकर यांचे निधन.विठोबा मानकर यांनी गेल्या पन्नास वर्षांत अनेक मल्ल तयार केले. पुण्याचे पहिले ‘महाराष्ट्र केसरी’ कै. हिरामण बनकर यांचे ते वस्ताद होत. 

दिनमान -
मेष :
अचानक धनलाभाची होतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 
वृषभ : वादविवादात सहभाग नको. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता आहे. 
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
कर्क : संततीसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. 
सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल. मानसन्मान, कीर्ती लाभेल.
कन्या : कामानिमित्त प्रवास होतील. तुम्ही आपले म्हणणे इतरांना पटवून द्याल. 
तूळ : आर्थिक चढ-उतार राहतील. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता. 
वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. संततीसाठी खर्च होतील. 
धनू : मानसिक अस्वस्थता राहील. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील.
मकर : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
कुंभ : कामानिमित्त प्रवास करावे लागतील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. 
मीन : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव राहील.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top