आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 December 2020

पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ७.०५ सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय दुपारी २.३९, चंद्रास्त पहाटे ३.३७, मोक्षदा एकादशी, ख्रिसमस नाताळ, गीताजयंती, मौनी एकादशी (जैन), भारतीय सौर पौष ४ शके १९४२.

पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ७.०५ सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय दुपारी २.३९, चंद्रास्त पहाटे ३.३७, मोक्षदा एकादशी, ख्रिसमस नाताळ, गीताजयंती, मौनी एकादशी (जैन), भारतीय सौर पौष ४ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२४ - भारताचे माजी पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ता, उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण  अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म.
१९७७ - जागतिक कीर्तीचे विख्यात चित्रपट अभिनेते व निर्माते चार्ली चॅप्लिन यांचे निधन. हिटलरच्या हुकूमशाहीवर विनोदाच्या व उपहासाच्या माध्यमातून टीका करणारा त्यांचा ‘ग्रेट डिटेक्‍टर’ हा चित्रपट अत्यंत प्रभावी होता. त्यांच्या ‘लाईम लाईट’ या चित्रपटाला ‘ऑस्कर’ पारितोषिक मिळाले होते. 
१९९८ - संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ.कलानाथ शास्त्री व प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा.कल्याणदत्त शर्मा यांना ‘राष्ट्रपती पुरस्कार’ जाहीर.
१९९८ - ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक दत्तात्रय गोविंद उर्फ दत्ता खेबुडकर यांचे निधन. 

दिनमान -
मेष :
वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.आरोग्य उत्तम राहील.
सिंह : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या : महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता आहे. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
मकर : राहत्या किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.
कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
मीन : इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार मार्गी लावू शकाल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 25th December 2020