आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २५ जानेवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

सोमवार : पौष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त -  ६.२५, चंद्रोदय दुपारी ३.२०, चंद्रास्त पहाटे ४.५८, भारतीय सौर माघ ४ शके १९४२.

सोमवार : पौष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त -  ६.२५, चंद्रोदय दुपारी ३.२०, चंद्रास्त पहाटे ४.५८, भारतीय सौर माघ ४ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिनविशेष
१९८० - सोलापूरचे पंचांगकर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.
१९९४ - नागा बंडखोरांच्या हल्ल्यातून आपल्या पथकातील जवानांना वाचविताना धारातीर्थी पडलेले कर्नल नीलकांतन जयचंद्रन नायर यांना ‘अशोक चक्र’ पुरस्कार जाहीर.
१९९६ - रंगभूमी व चित्रपटांतील गुणवान अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.
२००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
२००१ - जम्मू-काश्‍मीरमध्ये अतिरेक्‍यांविरुद्धच्या कारवाईत धारातीर्थी पडलेले मेजर प्रदीप रामचंद्र ताथवडे, लेफ्टनंट नरेंद्र आत्माराम मयेकर, कॅप्टन आर. सुब्रह्मण्यम, लेफ्टनंट रवींद्र चिकारा यांना ‘कीर्ती चक्र’ हा शौर्यासाठीचा देशातील मानाचा बहुमान जाहीर.
२००२ - संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आणि आखूड पल्ल्याच्या ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
२००४ - प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम. एन. वेंकटचलय्या यांना पद्मविभूषण किताब जाहीर.

------------------------------------

दिनमान
मेष : प्रवास सुखकर होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
वृषभ : मनोबल उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मिथुन : दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल आहे. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
कर्क : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील.
कन्या : सार्वजनिक कामात उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
तूळ : दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल आहे. कामात अडचणी जाणवतील.
वृश्‍चिक : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. वैवाहिक सौख्य लाभेल.
धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दुपारनंतर अनपेक्षित खर्च होईल.
कुंभ : मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
मीन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील.
प्रा. रमणलाल शहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daily-horoscope-and-panchang-25th-january-2021