
पंचांग -
गुरुवार - आषाढ शु. ४, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. ९.३७, चंद्रास्त रा. १०.५८, भारतीय सौर ४, शके १९४२.
पंचांग -
गुरुवार - आषाढ शु. ४, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. ९.३७, चंद्रास्त रा. १०.५८, भारतीय सौर ४, शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८३८ - प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील ‘वंदे मातरम’ या गीताचा स्वातंत्र्यलढ्यात मोठाच परिणाम झाला होता.
१८७९ - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर विल्यम फॉदरगिल कक यांचे निधन. हायडेलबर्ग येथे असताना त्यांनी तारेच्या साह्याने संदेशवहन करण्याचे प्रात्यक्षिक पाहिले व त्यामुळे विद्युत तारायंत्र करण्याकडे त्यांचे लक्ष वेधले.
१९१८ - कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
१९३१ - भारताचे सातवे पंतप्रधान विश्वनाथप्रताप सिंह यांचा जन्म.
१९३४ - महात्मा गांधींना पुणे महापालिकेने मानपत्र दिले, त्या वेळी त्यांच्यावर बाँबहल्ल्याचा प्रयत्न.
१९७९ - हवेली तालुक्याचे शिल्पकार, पिंपरी-चिंचवड पालिकेचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांचे निधन.
१९८३ - कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडीज संघाचा ४३ धावांनी पराभव करून प्रुडेन्शिअल विश्वकरंडक जिंकला. या सामन्यात मोहिंदर अमरनाथला ‘ंमॅन ऑफ द मॅच’ पारितोषिक देण्यात आले.
१९९४ - लंडन येथील ॲलेक्स केली या शालेय क्रिकेटपटूने एकही धाव न देता दहा गडी बाद करण्याचा विक्रम केला.
२००० - मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या, मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या माजी कार्यकारी सदस्य रविबाला सोमण-चितळे यांचे निधन.
दिनमान -
मेष : मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न दुपारनंतर सोडवू शकाल. काहींना सुसंधी लाभेल.
वृषभ : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. अडचणी कमी होतील. .
मिथुन : लहानसहान प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासात काळजी घ्यावी.
कर्क : आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
सिंह : खर्चाचे प्रमाण कमी होईल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोरंजनाकडे कल राहील.
तूळ : व्यवसायातील कामे मार्गी लागतील. दुपारनंतर मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : मानसिक बल वाढेल. मन आशावादी राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
धनू : महत्त्वाचे निर्णय दुपारनंतर घ्यावेत. दुपारपूर्वी मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
मकर : जिद्द व चिकाटी वाढणार आहे. दुपारनंतर वादविवाद नकोत.
कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.
मीन : आरोग्य चांगले राहील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.