esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - अधिक अश्‍विन शु.9, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.28, चंद्रोदय स. 8.04, चंद्रास्त रा. 8.21, भारतीय सौर 3, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - अधिक अश्‍विन शु.9, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.28, चंद्रोदय स. 8.04, चंद्रास्त रा. 8.21, भारतीय सौर 3, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८१ : मराठी कथाकार आणि विनोदकार गोपाळ गंगाधर लिमये यांचा जन्म. ‘कॅप्टन गो. गं. लिमये’ या नावाने त्यांनी लेखन केले. त्यांचे सखा सोनचाफा व इतर गोष्टी, वन ज्योत्स्ना, शकूचा भाऊ, तिच्याकरिता आणि हेलकावे हे कथासंग्रह, तुमच्याकरिता व विनोदबकावली हे विनोदी लेखांचे संग्रह प्रसिद्ध झाले.
१९२२ : आधुनिक भारतातील एक नामवंत संसदपटू, समाजवादी चळवळीतील चैतन्यदायी नेता, स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म.
१९२६ : अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म. 
९९८ : मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी, प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते व लेखक  कमलाकर सारंग यांचे निधन. ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाने त्यांच्या कारकिर्दीला वेगळेच वळण व झळाळी दिली. 
१९९९ : ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ डॉ.कस्तुरीरंगन, रसायनशास्त्रज्ञ प्रा.एम.एस.शर्मा आणि डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
२००४ : साठच्या दशकानंतर इंग्रजी व मराठी भाषेत दर्जेदार काव्यनिर्मिती केलेले ज्येष्ठ कवी अरुण कोलटकर यांचे निधन.  त्यांचा ‘जेजुरी’ हा इंग्रजी दीर्घकाव्य संग्रह १९७६ मध्ये प्रकाशित झाला.

दिनमान -
मेष :
प्रसिद्धी लाभेल. सुसंधी लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुप्त वार्ता कळेल. भागीदारीत फायदा होईल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमची मते इतरांना पटवून द्याल. कामात यश मिळवाल.
कर्क : उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
सिंह : शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे. संततिसौख्य लाभेल.  
कन्या : वाहन खरेदीसाठी दिवस चांगला आहे. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
तुळ : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. 
वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कुटुंबासाठी खर्च कराल. गूढ वार्ता कळेल.
धनु : आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. 
मकर : कर्ज प्रकरणे पुढे ढकलावीत. आध्यात्माकडे कल राहील.
कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. चांगल्या घटना घडतील. विविध लाभांचे प्रमाण वाढेल.
मीन : राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. आपले म्हणणे इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

Edited By - Prashant Patil