
पंचांग -
शनिवार - मार्गशीर्ष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ७.०५ सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय दुपारी ३.१६, चंद्रास्त पहाटे ४.२८, तिथिवासर सकाळी ८.३१ पर्यंत, भारतीय सौर पौष ५ शके १९४२.
पंचांग -
शनिवार - मार्गशीर्ष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ७.०५ सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय दुपारी ३.१६, चंद्रास्त पहाटे ४.२८, तिथिवासर सकाळी ८.३१ पर्यंत, भारतीय सौर पौष ५ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१९९८ ः पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने ज्येष्ठ लावणीगायिका सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार प्रदान.
१९९९ ः नेहरूंच्या जमान्यातील काँग्रेस नेते व माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांचे निधन.
२००० ः जुन्या पिढीतील प्रसिद्ध नाटककार आणि साहित्यिक प्रा. शंकर गोविंद साठे यांचे निधन.
२००१ ः निष्णात शल्यविशारद, कुशल वैमानिक आणि उत्तम छायाचित्रकार डॉ. सुरेश विश्वनाथ ऊर्फ एस. व्ही. भावे यांचे निधन. वैद्यक आणि शल्यचिकित्सेबरोबरच हवाई उड्डाण आणि छायाचित्रणाच्या क्षेत्रातही स्वतःचा आगळा ठसा डॉ. भावे यांनी उमटविला.
२००३ ः अवकाश प्रणोदक तंत्रज्ञानातील (स्पेस प्रॉपेलेंट टेक्नॉलॉजी) उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘सतीश धवन विशेष प्राध्यापक’ हे पद जाहीर करून त्यांचा आगळा सन्मान केला.
दिनमान -
मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
वृषभ : अनपेक्षितपणे मोठा खर्च संभवतो. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. काहींचे बौद्धिक व मानसिक परिवर्तन होईल.
कर्क : प्रॉपर्टीच्या कामात विचारविनिमय संभवतो. प्रश्न मार्गी लावू शकाल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : प्रवास शक्यतो टाळावेत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्चिक : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. हितशत्रुंवर मात कराल.
धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन : आर्थिक सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.हितशत्रुंवर मात कराल.
Edited By - Prashant Patil