esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २६ फेब्रुवारी २०२१

बोलून बातमी शोधा

Bhavishya}

पंचांग -
शुक्रवार : माघ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय सायंकाळी ५.४९, चंद्रास्त सकाळी ७, पौर्णिमा प्रारंभ दुपारी ३.५०, अन्वाधान, भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २६ फेब्रुवारी २०२१
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : माघ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय सायंकाळी ५.४९, चंद्रास्त सकाळी ७, पौर्णिमा प्रारंभ दुपारी ३.५०, अन्वाधान, भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
२००३ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते महाराष्ट्राचे सुपुत्र व देशातील अग्रगण्य उद्योगपती कै. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशित करून उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
२००३ : राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचे संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये अनावरण झाले.
२००४ : ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांचे निधन. नांदेडचे नगराध्यक्ष, राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री अशा विविध पदांवर काम केलेले शंकरराव चव्हाण यांचा ‘मराठवाड्याचे शिल्पकार’ असा लौकिक आहे. तत्त्वनिष्ठ, ध्येयवादी व नैतिक मूल्ये जपणारे अशी त्यांची ओळख कायम राहील. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलपतिपदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली.

दिनमान -
मेष :
महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. आरोग्य उत्तम राहील. 
कन्या : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी पूर्ण करावीत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.
तुळ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.
वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.
धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : आरोग्य उत्तम राहील. आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
कुंभ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. निर्णय मार्गी लागतील.
मीन : अपेक्षित गाठीभेटी होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Edited By - Prashant Patil