आजचे राशिभविष्य - 26 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

आज काय आहे तुमच्या भविष्यात? जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

दिनमान

मेष - महत्त्वाची कामे पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृषभ - मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन - व्यवसायात समाधानकारक स्थिती राहणार आहे. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील.

कर्क - दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह - वैवाहिक सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

कन्या - काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ - शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

वृश्‍चिक - प्रवास सुखकर होतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

धनु - आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. दैनंदिन कामात यश लाभेल.

मकर - कर्ज प्रकरणे मंजूर होतील. विरोधकांवर मात कराल.

कुंभ - आरोग्य उत्तम राहील. मानसिक सौख्य लाभेल.

मीन - दैनंदिन कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 26th october 2020