आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 December 2020

पंचांग -
रविवार : मार्गशीर्ष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.०५, चंद्रोदय दुपारी ३.५६, चंद्रास्त पहाटे ५.२०, प्रदोष, भारतीय सौर पौष ६ शके १९४२.

पंचांग -
रविवार : मार्गशीर्ष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.०५, चंद्रोदय दुपारी ३.५६, चंद्रास्त पहाटे ५.२०, प्रदोष, भारतीय सौर पौष ६ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९८ : विदर्भात शिक्षणप्रसार करणारे सामाजिक कार्यकर्ते व माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ.पंजाबराव श्‍यामराव देशमुख यांचा जन्म. कापूस बाजार, शेती क्षेत्रात अनेक आमूलाग्र सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. त्यांच्या स्मरणार्थ अकोला येथे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.
१९६५ : प्रसिद्ध बालसाहित्यिक व ‘ज्ञानोदय’चे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.
१९९५ : कुष्ठरोग निर्मूलनाच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल भारताचे डॉ. एस. के. नुरुद्दीन आणि ब्रिटनच्या श्रीमती जीन वॅटसन यांना गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
१९९६ : प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९९७ : ‘लपविलास तू हिरवा चाफा’, ‘त्या तिथे पलीकडे तिकडे’ अशी अनेक मधुर भावगीते गाऊन सुगम संगीताच्या क्षेत्रात कीर्ती मिळविलेल्या ज्येष्ठ गायिका डॉ. मालती पांडे-बर्वे यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.
वृषभ : प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 
कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. संततिसौख्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात प्रगती होईल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. 
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल.कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 27th December 2020