esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २७ जुलै

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
सोमवार - श्रावण शु. 7/8, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु.12.26, चंद्रास्त रा.11.56, भारतीय सौर 5, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २७ जुलै
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
सोमवार - श्रावण शु. 7/8, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु.12.26, चंद्रास्त रा.11.56, भारतीय सौर 5, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९५ - ज्येष्ठ बीनकार उस्ताद बंदे अली खाँ यांचे निधन. ते किराणा घराण्याचे प्रवर्तक मानले जातात. अत्यंत सूक्ष्म स्वरांचे भान असणारे, मधुर वादन करणारे, असा त्यांचा लौकिक होता. ते ध्रुपदगायकही होते. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात बंदे अली खाँ यांची कबर आहे.
१९११ - जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ, अन्न व पोषण याविषयी मूलभूत विचार मांडणारे आहारतज्ज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म.
१९२५ - पुणे रेल्वे स्थानक या वास्तूचे मुंबई इलाख्याचे ब्रिटिश गव्हर्नर लेस्ली आर्म विल्सन यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. ही वास्तू आज ८१ व्या वर्षांत प्रवेश करीत आहे. 
१९७५ - गांधीवादी नेते व माजी खासदार त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन. भारतीय राज्यघटनेचे मराठी भाषांतर तत्परतेने करून २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हाती देण्याचे काम त्यांनी केले.
२००२ - उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.

दिनमान -
मेष :
उत्साह व मनोबल वाढेल. आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल.खर्चाचे प्रमाण वाढेल. 
वृषभ : जुने येणे वसूल होईल. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.
मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. अपेक्षित फोन व पत्र व्यवहार होतील.
कर्क  : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. संततिसौख्य लाभेल.
सिंह : मित्रांचे सहकार्य लाभणार आहे. अडचणीवर मात कराल.प्रगती वेगाने होईल.
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.
तूळ : नवे हितसंबंध निर्माण होतील. तुमचे कार्यक्षेत्र व्यापक होणार आहे.
वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका.
धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल.व्यवसायाची वाढ होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.
कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे.
मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींच्या संदर्भात समस्या निर्माण होतील.

Edited By - Prashant Patil