esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 मे 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : वैशाख कृष्ण १, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय रात्री ८.१६, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, चंद्रास्त सकाळी ६.३४, इष्टि, नारद जयंती, भारतीय सौर ज्येष्ठ ६ शके १९४३.

दिनविशेष -

१९३५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन.

१९३८ : मराठीतील एक आघाडीचे कादंबरीकार, कवी, इंग्रजी व मराठी साहित्याचे विलक्षण अभ्यासक, मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने डी.लिट. देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

१९६४ : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन. १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आला. भारत सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता यासाठी नेहरू पुरस्कारासाठी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

दिनमान -

मेष : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ : वरिष्ठांची कृपा लाभेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

मिथुन : आध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क : नवीन परिचय होतील. काहींची वैचारिक प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तुळ : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक सुयश लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वादविवाद टाळावेत.

मकर : आथिंक लाभाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. नवीन हितसंबंध निर्माण कराल.

कुंभ : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. गुरूकृपा लाभेल.