esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.26, कमला एकादशी, चंद्रोदय दु. 3.49, चंद्रास्त रा.2.25, भारतीय सौर 5, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.26, कमला एकादशी, चंद्रोदय दु. 3.49, चंद्रास्त रा.2.25, भारतीय सौर 5, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक पर्यटन दिन

१८३३ : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, वृत्तपत्रकार व सतीची प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचे निधन.
१९०७ : नामवंत संगीत समीक्षक वामन हरी देशपांडे यांचा जन्म. त्यांनी मराठी व इंग्रजीतही समीक्षात्मक ग्रंथ लिहिले. ‘घरंदाज गायकी’ व ‘आलापिनी’ हे त्यांचे ग्रंथ. 
१९२५ : डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
१९२९ : ‘काळ’ या नितयकालिकाचे संस्थापक संपादक शिवराम महादेव परांजपे यांचे निधन.  वक्रोक्ती आणि भाषासौष्ठव हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. बेळगाव येथे झालेल्या साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९७२ : ग्रंथालयशास्त्र व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक एस. आर. रंगनाथन यांचे निधन. त्यांनी ‘द्विबिंदू वर्गीकरण पद्धती’चा (कोलन क्‍लासिफिकेशन) आराखडा प्रसिद्ध केला. १९५७ मध्ये सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ सन्मान प्रदान केला.
१९९२ : महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील थोर तपस्विनी अनुताई वाघ यांचे निधन.
१९९८ : चिमणरावाच्या आईची अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या आणि दूरदर्शन मालिका व जाहिरातींद्वारे आपला अभिनय साकार करणाऱ्या सुलभा कोरान्ने यांचे निधन.
१९९९ : ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ विजेत्या समाजसेविका व जामखेड येथील बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल रजनीकांत आरोळे यांचे निधन.
२००० : जुन्या पिढीतील गायक व संगीतदिग्दर्शक नीलकंठबुवा अभ्यंकर यांचे निधन.  ‘स्वरसम्राज्ञी’ या गाजलेल्या नाटकाचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते.
२००१ : पाच दशकांहून अधिक काळ आंध्र प्रदेशच्या राजकारणावर ठसा उमटविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. विजयभास्कर रेड्डी यांचे निधन.
२००३ : तपोमूर्ती, वैदिक ऋषिकल्प व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ कृष्ण दीक्षित सेलूकर महाराज यांचे निधन.
२००४ : प्रख्यात ठुमरी गायिका शोभा गुर्टू यांचे निधन. दादरा, कजरी, होरी आदी प्रकारच्या उपशास्त्रीय संगीत प्रकारांसाठी शोभाताई प्रसिद्ध होत्या. सावन की रितू, चैत्र चुनरी, छोडो गागरियाँ, आज बिरज मैं या त्यांच्या काही गाजलेल्या ध्वनिफिती होत. ‘उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या...’ हे गाणे त्यांनी अजरामर केले. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. 

दिनमान -
मेष :
तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव पडेल. अधिकार व सत्ता लाभेल. गुणांना वाव मिळेल.
वृषभ : काहींना गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रसिद्धी लाभेल.
मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. शत्रुपिडा नाही. 
कर्क : आत्मविश्‍वास कमी राहील. वादविवाद टाळावेत. कामे रखडण्याची शक्यता आहे.
सिंह : अचानक एखादे संकट उद्भवण्याची शक्यता. विरोधकांवर मात कराल. 
कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. 
तुळ : संततीसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. 
वृश्‍चिक : मानसिक चंचलता जाणवेल. कामानिमित्त छोटे प्रवास होतील.
धनु : हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 
मकर : वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 
कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. सार्वजनिक कामात सहभागी व्हाल.
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. सत्ता लाभेल.

Edited By - Prashant Patil