esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 28 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - भाद्रपद शु. 10, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.52, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 7, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 28 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - भाद्रपद शु. 10, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.52, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 7, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२८ - भारतीय पदार्थ वैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म. त्यांनी वैश्‍विक किरणांवर संशोधन केले.
१९६९ - स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते, थोर विचारवंत पु. ह. तथा रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.
१९८४ - माजी केंद्रीय नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण रघुनाथ केसकर यांचे निधन. आकाशवाणी नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या विकासात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.
१९९० - इराकने कुवेत हा आपला १९ वा प्रांत असल्याचे जाहीर केले. त्यातूनच आखाती युद्ध पेटले. नंतर इराकला माघार घ्यावी लागली.
१९९४ - स्वातंत्र्यसैनिक आणि लघुपट निर्माते लक्ष्मीकांत शुक्‍ल यांचे निधन.
१९९४ - बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील डॉ. गीता सेन यांना ‘व्होल्वो पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. त्यांच्या ‘पर्यावरण आणि सामाजिक रचना’ या विषयावरील कामासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. 
१९९६ - सामाजिक कार्यकर्त्या, महिला सेवाग्रामचे २७ वर्षे काम करणाऱ्या लेखिका सुमती संत यांचे निधन.
२००१ - ग्रामीण भाग व निसर्गाचे वर्णन चित्रवती शैलीत करणारे लेखक, निसर्गप्रेमी चित्रकार, शिकारी, पटकथाकार असा असाधारण प्रतिभाशाली कलावंत व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आरोग्य चांगले राहील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 
वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे. 
मिथुन : अनेकांशी सुसंवाद साधाल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. 
कर्क  : व्यवसायात चांगली स्थिती राहील.  काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. 
सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.   
कन्या : स्वास्थ्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीमध्ये स्वास्थ्य लाभेल. 
तूळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. 
वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 
धनू : तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनामध्ये अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. 
मकर  : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. एखादी मानसिक चिंता राहील. 
कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील. मनोबल वाढेल. 

Edited By - Prashant Patil