esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

daily-horoscope

सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.०६, चंद्रोदय दुपारी ४.४०, चंद्रास्त सकाळी ६.१४, भारतीय सौर पौष ७ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.०६, चंद्रोदय दुपारी ४.४०, चंद्रास्त सकाळी ६.१४, भारतीय सौर पौष ७ शके १९४२.

------------------------------------------------------

१९३२ - रिलायन्स या भारतातील सर्वांत मोठ्या समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा जन्म. ‘बिझनेस बॅरन’ या अर्थविषयक मासिकाने जागतिक पातळीवर १९९९ मध्ये घेतलेल्या जनमत चाचणीत प्रसिद्ध उद्योगपती धीरुभाई अंबानी यांची ‘शतकातील उद्योगपती’ म्हणून निवड केली होती.
१९४० - कादंबरीकार, लघुकथालेखक व पत्रकार नगेंद्रनाथ गुप्त यांचे निधन. त्यांनी १२ कादंबऱ्या व ३ लघुकथासंग्रह लिहिले. 
१९९५ - ‘आयआरएस-१सी’ या भारताच्या तिसऱ्या दूरसंवेदन उपग्रहाचे कझाकिस्तानातील बैकानूर अंतराळतळावरून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण.

------------------------------------------------------

दिनमान: 
मेष :
उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. प्रवास सुखकर होतील.
कन्या : काहींना गुरुकृपा लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
वृश्‍चिक : आत्मविश्‍वास वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : व्यवसायात वाढ करू शकाल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रवास सुखकर होतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभ समाधानकारक राहील.
- प्रा. रमणलाल शहा

loading image