esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २८ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - श्रावण शु. 9, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय दु.1.25, चंद्रास्त रा.12.29, भारतीय सौर 6, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २८ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - श्रावण शु. 9, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय दु.1.25, चंद्रास्त रा.12.29, भारतीय सौर 6, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९३६ - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू गारफील्ड सोबर्स यांचा जन्म. कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजविली. १९५८ मध्ये त्यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध पहिल्या डावात नाबाद ३६५ धावा ६०८ मिनिटांत केल्या.
१९७७ - अमर भूपाळी चित्रपटात होनाजी बाळाची ‘घनश्‍याम सुंदरा’ ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक, अभिनेते पंडितराव नगरकर यांचे निधन. त्यांचे खरे नाव गोविंद परशुराम नगरकर.
१९८१ - नाटककार व भावगीतकार अनंत विष्णू ऊर्फ बाबूराव गोखले यांचे निधन. त्यांच्या ‘करायला गेलो एक’ नाटकाच्या प्रयोगसंख्येने विक्रम केला. ‘वऱ्हाडी माणसं’, ‘स्वयंसिद्धा’, ‘देव नाही देव्हाऱ्यात’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. 
१९८८ - सलग आठ वेळा राष्ट्रीय अजिंक्‍यपद मिळविणारे बॅडमिंटनपटू सैद मोदी यांची हत्या.
१९९४ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगदीशचंद्र जैन यांचे निधन.
१९९८ - ग्रामीण कथाकार बाबा पाटील यांचे निधन.

दिनमान -
मेष :
शैक्षणिक कार्यात यश मिळेल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत.
वृषभ : वैवाहिक सौख्य लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मिथुन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.
कर्क  : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 
सिंह : प्रगती वेगाने होणार आहे. फक्त मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.
कन्या : व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल.
तूळ : तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे. चिकाटीच्या जोरावर यश मिळवाल.
वृश्‍चिक : खर्च वाढणार आहेत. कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल.
धनू : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील.
मकर : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. अपेक्षित कामे पूर्ण होणार आहेत.
मीन : एखादी मानसिक चिंता राहणार आहे. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.

Edited By - Prashant Patil