आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २८ जून

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
रविवार - आषाढ शु. ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१६, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु. १२.३४, चंद्रास्त रा. १२.२५, भारतीय सौर ७, शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७३ - फ्रेंच शल्यविशारद अलेक्‍सिस कॅरेल यांचा जन्म. मानवी शरीरातील रक्तसंक्रमण करणाऱ्या धमन्यांचे यशस्वी रोपण केल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने गौरविले.
१९३७ - प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक गंगाधर पानतावणे यांचा जन्म.
१९७२ - भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. जागतिक संख्याशास्त्राच्या क्षेत्रात भारताचे स्थान दृढमूल करणारे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कीर्ती आहे. 
१९८७ - ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी यांचे निधन.
१९९४ - रशियाच्या ओलेम सॅलेन्कोने कॅमेरूनविरुद्ध पाच गोल करून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. विश्वकरंडक स्पर्धेत यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल नोंदविण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.
१९९८ - संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्कविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण.
१९९९ - स्वातंत्र्यसैनिकांचे ज्येष्ठ नेते, जुन्या पिढीतील झुंजार पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी संमेलनाध्यक्ष रामचंद्र विठ्ठल ऊर्फ रामभाऊ निसळ यांचे निधन.
२००० - प्रसिद्ध उद्योगपती आणि व्ही. एम. जोग इंजिनिअरिंग लिमिटेडचे संस्थापक व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे निधन.
२००० - चित्रपटाच्या कृष्णधवल युगात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र मलोन यांचे मुंबई येथे निधन.
२००१ - ‘अनारकली’ आणि ‘नागीन’ या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते तोलाराम जालान यांचे निधन. फिल्मिस्तान या बॅनरखाली त्यांनी १२० चित्रपट तयार केले.

दिनमान -
मेष :
मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. काहींना दवाखान्याला भेट द्यावी लागेल. 
वृषभ : व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आरोग्य चांगले राहणार आहे.  
कर्क : काहींना नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. आरोग्य चांगले राहील. 
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. 
कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडावे.
तूळ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 
वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक. 
धनू : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
मकर : काहींना सुसंधी लाभेल. महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांबरोबर सल्ला मसलत करून घ्यावेत.
कुंभ : आपली रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. 
मीन : जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com