esakal | तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

पंचांग

गुरुवार ः ज्येष्ठ शु.६ चंद्रनक्षत्र पुष्प, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०७, गुरुपुष्यामृत चंद्रोदय स. १०.४३ चंद्रास्त रा. ११.५७, भारतीय सौर ७,   शके १९४२.

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

पंचांग

गुरुवार ः ज्येष्ठ शु.६ चंद्रनक्षत्र पुष्प, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०७, गुरुपुष्यामृत चंद्रोदय स. १०.४३ चंद्रास्त रा. ११.५७, भारतीय सौर ७,   शके १९४२.

दिनविशेष 

१८८३ - महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, लेखक, प्रभावी वक्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. 
१९०३ - भारताच्या औद्योगिक क्षेत्राचे अध्वर्यू आणि किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ उद्योगमहर्षी ‘पद्मभूषण’ शंतनूराव किर्लोस्कर यांचा जन्म. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१९२१ - पं. दत्तात्रेय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्म.
१९२३ - तेलगू चित्रपट व्यवसायातील लोकप्रिय अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामाराव यांचा जन्म.
१९६१ - विख्यात प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्ण गोडे यांचे निधन. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१९८२ - बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन. १९२५ ते १९५० या कालावधीत त्यांचे कित्ते महाराष्ट्रातील शाळांमधून लावले गेले होते. त्यातून ते घराघरातून पोचले व ‘कित्तेवाले’ म्हणून लोक त्यांना ओळखू लागले. ती त्यांची ‘पदवी’ झाली.
१९९२ - नौदलाच्या जहाजांना गती देणाऱ्या संयत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रतिकृती (सिम्युलेटर) चे नौदल प्रमुख ॲडमिरल एल. रामदास यांच्या हस्ते लोणावळा येथील आय.एन.एस.शिवाजी येथे उद्‌घाटन.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१९९९ - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साताऱ्याच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांना राजमाता जिजाऊसाहेब मानवंदना समितीतर्फे रोख अकरा लाख रुपये व पाच लाख रुपये किमतीचा सोन्याचा तोडा असे विशेष पारितोषिक प्रदान.

दिनमान

मेष : खरेदीसाठी अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्रगती होईल.
वृषभ : उत्साह व उमेद वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. दिवसभर कार्यरत रहाल.
मिथुन : विरोधकावर मात कराल. मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्‍यता आहे.
कर्क : प्रगती वेगाने होईल. अनेक कामे हातावेगळी करू कराल.
सिंह :उत्साह व उमेद वाढेल.  खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचा प्रभाव वाढेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. कामे मार्गी लागतील.
तुळ : आरोग्याकडे लक्ष हवे. आर्थिक क्षेत्रात योग्य निर्णय  घ्याल.
वृश्‍चिक : घरात समाधानाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.
धनु : उत्साह व उमेद वाढेल. मन:स्तापाची शक्‍यता आहे. मनोबल उत्तम राहील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मकर : संततिसौख्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कुंभ : जबाबदारी वाढेल. व्यवसायाकडे विशेष लक्ष द्याल.
मीन : उत्साह व उमेद वाढेल. प्रगती वेगाने होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे.