
पंचांग -
शनिवार - कार्तिक शुद्ध १३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.४०, चंद्रास्त पहाटे ५.४४, वैकुंठ चतुर्दशीचा उपवास, आवळीच्या झाडाखाली विष्णूपूजन, मध्यरात्री विष्णूपूजन, श्रीगोरक्षनाथ प्रगट दिन, भारतीय सौर मार्गशीर्ष ७ शके १९४२.
पंचांग -
शनिवार - कार्तिक शुद्ध १३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.४०, चंद्रास्त पहाटे ५.४४, वैकुंठ चतुर्दशीचा उपवास, आवळीच्या झाडाखाली विष्णूपूजन, मध्यरात्री विष्णूपूजन, श्रीगोरक्षनाथ प्रगट दिन, भारतीय सौर मार्गशीर्ष ७ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८९० - श्रेष्ठ समाजसुधारक, विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचे निधन. स्त्री हक्क, स्त्रीदास्य विमोचन, स्त्रियांचे समान हक्क या सर्व विचारांना महात्मा फुले यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली व स्त्री जीवनात शिक्षणाची नवी पहाट उजाडली.
१९६७ - मुळशी सत्याग्रहाचे नेते, थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती पांडुरंग महादेव बापट यांचे निधन. त्यांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध मुळशीचे बंड करून स्वातंत्र्यलढ्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले.
२००० - तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
२००० - महाराष्ट्र राज्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वाहनांमधून मंजूर क्षमतेच्या दीडपटीपेक्षा जास्त विद्यार्थी नेऊ नयेत, असा उच्च न्यायालयाचा आदेश.
२००४ - रशियाच्या तांत्रिक सहकार्यातून ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) तयार करण्यात आलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची बहुउपयोगी ‘सुखोई-३०’ लढाऊ विमाने देशाला अर्पण. आवाजापेक्षाही अधिक गतीने उडणाऱ्या २६ टन वजनाच्या व सर्व प्रकारच्या आण्विक व पारंपरिक क्षेपणास्त्रांसह अचूक बाँबफेकीची क्षमता असलेले हे विमान आहे.
दिनमान -
मेष : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृषभ : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
कर्क : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. मान व प्रतिष्ठा वाढेल.
सिंह : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आरोग्य उत्तम राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
कन्या : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. सहकार्याची अपेक्षा नको.
तुळ : तुमची मते इतरांना पटवून देवू शकाल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.
वृश्चिक : कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अनावश्यक कारणांसाठी पैसा वाया जाईल.
धनु : प्रियजनांचा सहवास लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व फोन होतील.
मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मीन : व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
Edited By - Prashant Patil