जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 29 मे

प्रा. रमणलाल शहा
Friday, 29 May 2020

पंचांग

शुक्रवार ः ज्येष्ठ शु.७  चंद्रनक्षत्र आश्‍लेषा,मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय स. ११.४२ चंद्रास्त रा. १२.१३, भारतीय सौर ८,   शके १९४२.

पंचांग

शुक्रवार ः ज्येष्ठ शु.७  चंद्रनक्षत्र आश्‍लेषा,मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय स. ११.४२ चंद्रास्त रा. १२.१३, भारतीय सौर ८,   शके १९४२.

दिनविशेष 

१९०५ - भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. त्यांना १९७० मध्ये ‘विष्णुदास भावे सुवर्णपदक’ देण्यात आले.
१९५३ - तीस वर्षांच्या अथक प्रयत्नात तेरा वेळा अपयश सहन केल्यावर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी  ‘एव्हरेस्ट’ हे जगातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत केले. 
१९५८ - आचार्य विनोबा भावे यांनी हजारो दलितांसह पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१९७२ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार पृथ्वीराज कपूर यांचे निधन.
१९८७ - लोकदलाचे संस्थापक, माजी पंतप्रधान चरणसिंग यांचे निधन. 
१९९८ - दि न्यू इंडिया ॲश्‍युरन्स कंपनी लिमिटेडला ‘क्रिसील’ या पतश्रेणी संस्थेने ‘एएए’ हा उत्कृष्ट पतक्षमता दर्शविणारा दर्जा दिला. विमा क्षेत्रात अशा प्रकारचा पतदर्जा मिळविणारी ही पहिलीच भारतीय कंपनी आहे.
२००३ - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता ऊर्फ माईसाहेब आंबेडकर यांचे निधन. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२००३ - जगातील ‘एव्हरेस्ट’ या सर्वोच्च शिखरावर मानवाचे पहिले पाऊल पडण्याच्या घटनेचा सुवर्णमहोत्सव काठमांडू येथे थाटात पार पडला. या समारंभात एव्हरेस्टवर प्रत्यक्ष पाऊल टाकणारे सर एडमंड हिलरी यांना नेपाळचे सन्माननीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.

दिनमान

मेष : मनोबल वाढेल.आर्थिक प्रगती होईल. सार्वजनिक क्षेत्रात यश लाभेल.
वृषभ : उत्साह व उमेद वाढेल. स्वास्थ्य  लाभेल. धाडसाने काम कराल.
मिथुन : उत्साह, उमेद वाढेल. अडचणीवर मात कराल.आर्थिक प्रगती होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्क : आर्थिक प्रगती होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह : प्रतिष्ठा लाभेल. प्रगतीचा वेग वाढेल.आर्थिक प्रगती होईल. 
कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आश्‍वासनावर  विसंबू नका.
तुळ : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात यश लाभेल.
वृश्‍चिक :मनोबल उत्तम राहील. प्रभाव वाढणार आहे. मनासारखे घडेल.
धनु : कामे मार्गी लागतील. परिस्थिती सुधारेल.आरोग्याकडे लक्ष हवे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मकर : संततिसौख्य लाभेल. धाडस टाळावे. बोलण्यात कटुता टाळावी.
कुंभ : उत्साह व उमेद वाढेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. स्वास्थ्य लाभेल.
मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.आर्थिक प्रगती होईल.नवीन संधी मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 29h May 2020