आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 जुलै 2021

पंचांग - गुरुवार : आषाढ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय रात्री ११.०७, चंद्रास्त सकाळी १०.५०, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ७.०९, भद्रा, भारतीय सौर श्रावण ७ शके १९४३.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal
Updated on

पंचांग -

गुरुवार : आषाढ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय रात्री ११.०७, चंद्रास्त सकाळी १०.५०, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ७.०९, भद्रा, भारतीय सौर श्रावण ७ शके १९४३.

दिनविशेष -

१८८३ - इटलीचा फॅसिस्ट नेता व दुसऱ्या महायुद्धातील हिटलरचा साथीदार बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म.

१९०१ - एकोणिसाव्या शतकातील बंगालमधील सामाजिक सुधारणांचे अग्रणी पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन. त्यांच्या प्रयत्नांमुळेच १८५६ मध्ये विधवा विवाहाचा कायदा झाला.

१९०४ - आधुनिक भारतीय उद्योगाचे शिल्पकार आणि भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा यांचा जन्म. त्यांचे संपूर्ण नाव जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च बहुमान मिळालेले ते पहिले उद्योगपती.

१९२५ - ख्यातनाम व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांचा जन्म. थेट विनोद, ठसठशीत मांडणी, चेहऱ्यावरील बारकावे, दैनंदिन जीवनातील टिपलेला सूक्ष्म अनुभव, यामुळे शि.दं.ची शब्दरहित हास्यचित्रे बोलू लागतात.

दिनमान -

मेष : दैनंदिन कामातही अडचणी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वादविवाद टाळावेत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कन्या : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : अपेक्षित गाठीभेटी होतील. नवीन दिशा व नवा मार्ग दिसेल.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मीन : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com