esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २९ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
सोमवार -  आषाढ शु. ९, चंद्रनक्षत्र हस्त-चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय दु.१.३२, चंद्रास्त रा.१.०६, भारतीय सौर ८, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २९ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
सोमवार -  आषाढ शु. ९, चंद्रनक्षत्र हस्त-चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय दु.१.३२, चंद्रास्त रा.१.०६, भारतीय सौर ८, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७१ - प्रसिद्ध नाटककार, विनोदी लेखक, कवी आणि समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म.
१८९३ - भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आधुनिक संख्याशास्त्राच्या अभ्यासाचे जनक डॉ. प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्म.
१९३४ - प्रसिद्ध नट, दिग्दर्शक, निर्माते कमलाकर सारंग यांचा जन्म.  ‘सखाराम बाईंडर’, ‘कमला’, ‘रथचक्र’, ‘घरटे आमुचे छान’ ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके खूप गाजली.
१९६६ - प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ व विचारवंत प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे निधन. 
१९९२ - ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, आचार्य विनोबा भावे यांचे धाकटे बंधू शिवाजीराव नरहर भावे यांचे निधन. त्यांचे ‘श्री ज्ञानेश्वरी शब्दार्थकोश’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
१९९३ - ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे ज्येष्ठ गायक अभिनेते विष्णुपंत जोग यांचे निधन. त्यांनी मानापमान, पुण्यप्रभाव, सौभद्र, साध्वी मीराबाई या नाटकांतून केलेल्या भूमिका गाजल्या. 

दिनमान -
मेष :
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील, आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 
वृषभ : विद्यार्थ्यांना नवीन मार्ग दिसेल. संततिसौख्य लाभेल. काहींना संधी लाभेल.
मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार करताना जागरूक रहावे. निर्णय घाई गडबडीत घेऊ नये.
कर्क : काहींना गुरुकृपा लाभेल. मुलामुलींचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल.
सिंह : जुनी येणी वसूल होतील. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रगतीकडे वाटचाल कराल.
कन्या : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. 
तूळ : काहींना दवाखान्याला भेट द्यावी लागेल. अस्वास्थ्य कमी होईल. 
वृश्‍चिक : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. काहींना संधी लाभेल.
धनू : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कर्मचारी वर्ग कार्यरत राहील. 
मकर : काहींना नवीन मार्ग दिसेल, व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 
कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजू शकेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.
मीन : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आरोग्य चांगले राहणार आहे.