आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 नोव्हेंबर

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
रविवार - कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.१८, चंद्रास्त सकाळी ६.३५, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, (पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२.४७), आवळी पूजन व भोजन, कार्तिकस्वामी दर्शन, भारतीय सौर मार्गशीर्ष ८ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
पॅलेस्टिनी संयुक्त दिन

१९३९ : श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. रविकिरण मंडळाचे ते एक संस्थापक सदस्य होते. ख्यातनाम फारसी कवी उमर खय्याम यांच्या रुबायांचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला. विरहतरंग’, ‘सुधारक’ आणि ‘नकुलालंकार’ ही त्यांची खंडकाव्ये. 
१९५९ : मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन.
१९९३ : आधुनिक भारतीय उद्योगाचे शिल्पकार आणि भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांचे निधन. त्यांचे नाव जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान मिळालेले ते पहिले उद्योगपती.
१९९६ : नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांच्या मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
२००० - ज्येष्ठ गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ आणि दाक्षिणात्य संगीतक्षेत्रातील ज्येष्ठ घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.
२००३  : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन राष्ट्रपुरुषांच्या तैलचित्रांचे अनावरण उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते महाराष्ट्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाले.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ : अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. हितशत्रुंवर मात कराल.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कर्क : नवीन परिचय होतील. मनोबल उत्तम राहील.हितशत्रुंवर मात कराल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या :  प्रवास शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाची  कामे पुढे ढकलावीत.
तुळ : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रतिष्ठा वाढेल.
मकर : संततिसौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल.
मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com