esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २ ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - श्रावण शु. 14, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.14, सूर्यास्त 7.10, चंद्रोदय सायं. 6.18, चंद्रास्त प.4.45, भारतीय सौर 11, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २ ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - श्रावण शु. 14, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.14, सूर्यास्त 7.10, चंद्रोदय सायं. 6.18, चंद्रास्त प.4.45, भारतीय सौर 11, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५८ - ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजसत्ता संपुष्टात येऊन व्हिक्‍टोरिया राणीने देशाचा कारभार ताब्यात घेतला.
१८६१ - देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म. त्यांनी ‘बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही संस्था काढली. १८९६ मध्ये त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोगातून ‘मर्क्‍युरस नायट्रेट’ याची निर्मिती केली. 
१९१० - श्रेष्ठ मराठी कवी, कादंबरीकार, समीक्षक, नाटककार व संपादक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म. ‘साधना आणि इतर कविता’, ‘फुलोरा’, ‘हिमसेक’, ‘दोला’, ‘गंधरेखा’ इ. त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. 
१९१६ - प्रसिद्ध गीतकार, जातिवंत शायर शकील बदायुनी यांचा जन्म. त्यांची ‘दर्द’, ‘मदर इंडिया‘, ‘उडन खटोला’, ‘मेरे मेहबूब’ वगैरे चित्रपटांतील गाणी कमालीची गाजली.
१९१८ - दिवंगत थोर तत्त्वज्ञ साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व दादा जे. पी. वासवानी यांचा जन्म.
१९२२ - टेलिफोनचा शोध लावणारे संशोधक अलेक्‍झांडर ग्रॅहम बेल यांचे निधन.
१९७९ - जामखेड येथील डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मेबल आरोळे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
१९९६ - अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला.
२००३ - भारताचा ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे याने ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. ११ फेऱ्यांच्या स्पर्धेत त्याचे सर्वाधिक साडेआठ गुण झाले.
२००४ - भारताचे माजी नौदलप्रमुख एल. रामदास यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. त्यांना शांतता आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य यासाठी पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार अब्देर रहमान यांच्यासह संयुक्तरीत्या या गौरवाने सन्मानित करण्यात आले.

दिनमान -
मेष :
कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकलावीत. अचानक धनलाभाची शक्यता आहे.  
वृषभ : आर्थिक स्थैर्य राहील. वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतील.  
मिथुन : नोकरी, व्यवसायात अडचणी येतील. आर्थिक नुकसानीची शक्यता.
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
सिंह : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चिंता राहील.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. घरासाठी खर्च होतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
तूळ : वडिलांबरोबर मतभेद होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. 
वृश्‍चिक : आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल.
धनू : वैवाहिक सौख्यात अडचणी निर्माण होतील. वादविवादापासून दूर राहावे. 
मकर : मानसिक अस्वास्थता जाणवेल. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. 
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 
मीन : उधारी, उसनवारी नको. शासकीय कामे मार्गी लागतील. वडिलांचे सौख्य लाभेल.

Edited By - Prashant Patil