esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 2 ऑगस्ट 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 2 ऑगस्ट 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : आषाढ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय रात्री १.३३, चंद्रास्त दुपारी २.०८, सूर्योदय ६.१३, सूर्यास्त ७.०७, सूर्याचा आश्लेषा नक्षत्रप्रवेश, वाहन – मोर, भारतीय सौर श्रावण ११ शके १९४३.

दिनविशेष -

१८५८ - ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजसत्ता संपुष्टात येऊन व्हिक्‍टोरिया राणीने देशाचा कारभार ताब्यात घेतला.

१८६१ - देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म. त्यांनी ‘बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही संस्था काढली. १८९६ मध्ये त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोगातून ‘मर्क्‍युरस नायट्रेट’ याची निर्मिती केली. युरोपातील शास्त्रज्ञ त्यांना ‘मास्टर ऑफ नायट्रेट्‌स’ म्हणत असत.

१९१० - श्रेष्ठ मराठी कवी, कादंबरीकार, समीक्षक, नाटककार व संपादक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म. ‘साधना आणि इतर कविता’, ‘फुलोरा’, ‘हिमसेक’, ‘दोला’, ‘गंधरेखा’ इ. त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. रूपकथ्थक व मनवा हे कथासंग्रह व छांदसी हा त्यांचा समीक्षालेखांचा संग्रह प्रसिद्ध आहेत.

१८५८ - ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजसत्ता संपुष्टात येऊन व्हिक्‍टोरिया राणीने देशाचा कारभार ताब्यात घेतला.

दिनमान -

मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कामाचा ताण जाणवेल.

कर्क : नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान लाभेल.

कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. मताविषयी आग्रही राहाल.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

मीन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

loading image
go to top