आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय सायंकाळी ६.२२, चंद्रास्त सकाळी ७.४२, (पौर्णिमा समाप्ती सकाळी ८.५७), भारतीय सौर पौष ९ शके १९४२.

पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय सायंकाळी ६.२२, चंद्रास्त सकाळी ७.४२, (पौर्णिमा समाप्ती सकाळी ८.५७), भारतीय सौर पौष ९ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९७१ - भारतीय अवकाश विज्ञानाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद),  अहमदाबाद टेक्‍स्टाईल इंडस्ट्रियल रिसर्च असोसिएशन, स्पेस सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी सेंटर, थुंबा इक्वेटोरियल लाँचिंग सेंटर आदी संस्था स्थापन केल्या. 
१९९२ - महाराष्ट्रातील मराठी शाहिरी परंपरेतील एक बुलंद व प्रतिभासंपन्न आवाज असलेले शाहीरतिलक पिराजीराव रामजी सरनाईक यांचे निधन.
१९९३ - प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केंद्रीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट प्रकाशित.
१९९६ - आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात ठसा उमटविणारे पहिले भारतीय टेनिसपटू आणि संघटक दिलीप बोस यांचे निधन.

दिनमान -
मेष :
तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
वृषभ : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील.
मिथुन : मनोबल उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात फार मोठे धाडस नको.
सिंह : काहींचे नवीन परिचय होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल.
कन्या : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल.
वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
कुंभ : काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 30th December 2020