esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ३० जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - आषाढ शु. १०, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तुला, सूर्योदय ७.०३, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय दु.२.३१, चंद्रास्त रा. १.४७, भारतीय सौर ९, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ३० जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - आषाढ शु. १०, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तुला, सूर्योदय ७.०३, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय दु.२.३१, चंद्रास्त रा. १.४७, भारतीय सौर ९, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१७ - काँग्रेसचे एक संस्थापक, अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचे निधन. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होत.
१९८५ - गोवा विद्यापीठाचे उद्‌घाटन.
१९९२ - प्रसिद्ध मराठी साहित्यिक, वक्ते व समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.
१९९४ -  नाटककार, अभिनेते, निर्माते आणि कवी बाळ कोल्हटकर यांचे निधन. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ आणि ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही त्यांची विशेष गाजलेली नाटके होत.
१९९७ - प्रसिद्ध शास्त्रोक्त व नाट्य संगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन. त्यांनी सुमारे २५ वर्षे कै.राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.
१९९७ - ब्रिटनने चीनकडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटाच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
१९९९ - सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडविणारे मराठी काव्यसृष्टीतील ज्येष्ठ कवी, समीक्षक कृष्णा बळवंत तथा कृ.ब.निकुंब यांचे निधन.
२००० - ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते भारतीय भाषा परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
२००३ - संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, मराठीचे नामांकित प्राध्यापक व व्यासंगी संशोधक डॉ.पांडुरंग नारायण तथा पां.ना.कुलकर्णी यांचे निधन.

दिनमान -
मेष :
व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायातील घडामोडींकडे लक्ष द्यावे.
वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
मिथुन : विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गतीकडे लक्ष द्यावे. प्रवासात काळजी घ्यावी.
कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : काहींना गुरुकृपा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : जुनी येणी वसूल होतील. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील.
तूळ : गेल्या काही दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. 
वृश्‍चिक : आवश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. अस्वास्थ्य कमी होईल. धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य चांगले राहील. 
मकर : कर्मचारी वर्गाकडे लक्ष द्यावे. काहींना सुसंधी लाभेल. मुलामुलींकडे लक्ष देवू शकाल.
कुंभ : कुटुंबासाठी खर्च कराल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 
मीन : वादविवादात सहभाग टाळावा. आरोग्य चांगले राहणार आहे.