esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - अधिक अश्‍विन शु.14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सायं.5.45, चंद्रास्त प. 5.04, भारतीय सौर 8, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - अधिक अश्‍विन शु.14, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सायं. 5.45, चंद्रास्त प. 5.04, भारतीय सौर 8, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९३ : मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील उमरगा, किल्लारी व औसा परिसरात भीषण भूकंप. आठ गावे भुईसपाट झाली.  वीस हजारांपेक्षा जास्त लोक ठार तर दहा हजार लोक जखमी झाले.
२००० : देशातील रासायनिक उद्योगक्षेत्राच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशन अँड केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड (सीईडब्ल्यू) या संस्थेतर्फे ‘हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार जाहीर.
२००० : ‘जागर’ नाट्यसंस्थेचे संस्थापक, हौशी रंगभूमीवरील जाणकार दिग्दर्शक व वास्तुशिल्पकार अशोक अनंत जोशी यांचे निधन.
२००१ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव जिवाजीराव शिंदे यांचे विमान अपघातात निधन.
२००४ : हैदराबाद मुक्तिसंग्रामातील धुरंधर, लढवय्ये आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विजयेंद्र काबरा यांचे निधन. 
२००४ : लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे आणि ज्येष्ठ नृत्य कलावंत रोहिणी भाटे यांना डेक्कन कॉलेजतर्फे ‘डॉक्‍टर ऑफ लेटर्स’ ही सन्माननीय पदवी जाहीर.

दिनमान -
मेष : अधिकारपद लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
वृषभ : नावलौकिक व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 
मिथुन : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. साहित्याच्या क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. 
कर्क : महत्त्वाची कामे, प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. आत्मविश्‍वास कमी राहील.
सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. 
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. 
तुळ : अधिकारपद लाभेल. मोठमोठ्या व्यक्तींच्या ओळखी होतील. आर्थिक लाभ होईल.
वृश्‍चिक : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. 
धनु : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींना गुरूकृपा लाभेल. सुसंधी लाभतील.
मकर : उधारी, उसनवारी वसूल होईल. उमेद वाढेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. 
कुंभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.  
मीन : मनस्ताप होणाऱ्या घटना घडतील. ऐशारामाकडे कल राहील. संकटे उद्भवतील.

Edited By - Prashant Patil