esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण १, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय सायंकाळी ७.१८, चंद्रास्त सकाळी ७.४२, गुरुपुष्यामृत (सायंकाळी ७.४९ नंतर सूर्योदयापर्यंत), भारतीय सौर पौष १० शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण १, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ७.०७ सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय सायंकाळी ७.१८, चंद्रास्त सकाळी ७.४२, गुरुपुष्यामृत (सायंकाळी ७.४९ नंतर सूर्योदयापर्यंत), भारतीय सौर पौष १० शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९७६ - होळकर दरबारची वेदशास्त्रसंपन्न ही पदवी मिळविणारे आणि कीर्तनातील प्रावीण्याबद्दल कीर्तन वाचस्पती मुरलीधरबुवा निजामपूरकर यांच्याकडून ‘कीर्तनेंदु’ पदवी मिळविणारे, श्रीराम मंदिर, तुळशीबाग पुणे चे माजी विश्‍वस्त श्री. तात्यासाहेब तुळशीबागवाले यांचे निधन.
१९५१ - शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या ‘ज्ञानप्रकाश’ या दैनिकाचा शेवटचा अंक प्रकाशित.
१९९७ - मराठी संगीत रंगभूमी गाजविलेले नामवंत गायक-अभिनेते स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. त्यांचे मूळ नाव सौदागर नागनाथ गोरे. मानापमान, सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, संशयकल्लोळ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 
१९९८ - रंगभूमीवरील मानाचे ‘महिंद्र नटराज’ मानचिन्ह ज्येष्ठ गायक अभिनेते भालचंद्र पेंढारकर व प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर.
१९९८ - वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांची जे.आर.डी.टाटा पुरस्कारासाठी निवड.

दिनमान -
मेष :
उत्साह व उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : प्रॉपर्टीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. सांस्कृतिक कार्यात सहभागाची संधी मिळेल.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल.
वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. जबाबदारी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.
धनु : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मकर : नवीन स्नेहसंबंध जुळतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल.
मीन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग येतील.

Edited By - Prashant Patil

loading image