आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ३१ जानेवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 January 2021

पंचांग -
रविवार : पौष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्य़ा, चंद्रोदय रात्री ९.०२, चंद्रास्त सकाळी ९.०७, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ १० शके १९४२. 

पंचांग -
रविवार : पौष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्य़ा, चंद्रोदय रात्री ९.०२, चंद्रास्त सकाळी ९.०७, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.२६, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर माघ १० शके १९४२. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९३१ : मराठी संगीत विश्‍वाला अनेक अजरामर भावगीते, भक्तिगीते देणारे ज्येष्ठ गीतकार गंगाधर महांबरे यांचा जन्म.
१९५० : राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
१९९४ : नामवंत मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन.
१९९५ : बॅंकिंग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व शेअर बाजार नियामक मंडळाचे (सेबी) अध्यक्ष सुरेश नाडकर्णी यांचे निधन.
२००३ : कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता व्यंकटराव गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आय. एन. सिन्हा पारितोषिक’ जाहीर. जलसिंचन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यास नवी दिल्लीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर या संस्थेकडून दर वर्षी हे पारितोषिक दिले जाते.
२००४ : क्रीडामहर्षी हरिभाऊ साने यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल.
वृषभ : राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. 
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.प्रवासाचे योग येतील.
कर्क : व्यवसायात वाढ करू शकाल. काहींना मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : थोरामोठ्यांचे परिचय होतील. नवीन मार्ग दिसेल.प्रवास सुखकर होतील.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
तुळ : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृश्‍चिक : व्यवसायात वाढ करू शकाल. सार्वजनिक कामात यश लाभेल.
धनु : तुमचे निर्णय योग्य ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
कुंभ : वादविवाद शक्‍यतो टाळावेत. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.
मीन : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 31st January 2021