esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ३१ जुलै

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - श्रावण शु. 9, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.10, चंद्रोदय दु.4.26, चंद्रास्त रा.2.53, भारतीय सौर 9, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ३१ जुलै
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - श्रावण शु. 9, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.10, चंद्रोदय दु.4.26, चंद्रास्त रा.2.53, भारतीय सौर 9, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८० - हिंदी-उर्दू कादंबरीकार व कथालेखक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव धनपतराय.  त्यांनी सुमारे पंधरा कादंबऱ्या व तीनशे कथा लिहिल्या. त्यांच्या गाजलेल्या कथा-कादंबऱ्यांचे अनुवाद अनेक भारतीय व काही युरोपीय भाषांमध्ये झाले आहेत.
१८८७ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ प्रा. द. बा. लिमये यांचा जन्म. पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट या संस्थेचे ते संचालक होते. ‘करंजीन’ हे द्रव्य व ‘निधोन प्रक्रिया’ या शोधांबद्दल ते प्रसिद्ध होते. पुणे विद्यापीठाने ‘डी.लिट’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता.
१९४० - अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असलेले पंजाबचे माजी गव्हर्नर सर मायकेल ओडवायरच्या वधाबद्दल क्रांतिकारक उधमसिंग यांना फाशी.
१९८० - प्रसिद्ध पार्श्वगायक महंमद रफी यांचे निधन.  त्यांनी हिंदी व उर्दू या भाषांव्यतिरिक्त जवळजवळ सर्व प्रचलित भाषांमधून गाणी गायिली. १९६७ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले होते.
१९९२ - जागतिक कीर्तीचे सतारवादक पं. रवी शंकर यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर.
१९९५ - अखिल भारतीय श्रमिक पत्रकार महासंघाचे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार जगदीशप्रसाद चतुर्वेदी यांचे निधन.

दिनमान -
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. 
वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहणार आहे. कामात थोड्या अडचणी येतील.
कर्क  : प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
सिंह : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आर्थिक लाभ होतील.
कन्या : व्यवसायात मनासारखी वाढ होईल. मानसन्मानाचे योग येतील. 
तूळ : तुमचे क्षेत्र व्यापक होणार आहे. मानसिक उत्साह वाढेल.
वृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. वैवाहिक जीवनात मतभेद होतील.
धनू : कौटुंबिक सौख्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
मकर : महत्त्वाचे निर्णय नकोत. कामाचा ताण जाणवणार आहे.
कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल.
मीन : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil